विविध वाॅर्डात सिमेंट रस्त्याची कामे होणार
पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे करणार शुक्रवारी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
परळी // पांच कोटी रूपये खर्च करून शहरातील विविध वाॅर्डात चकाचक होत असलेल्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ४ तारखेला होणार आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नगरविकास विभागाकडून पांच कोटी रूपयांचा निधी कांही दिवसांपूर्वी मंजूर करून घेतला होता. या निधीतून विविध वाॅर्डात सिमेंट रस्त्याची चांगली कामे होणार आहेत. येत्या शुक्रवारी दुपारी ४ वा. मोंढा विभागात होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, ज्येष्ठ नेते रमेश आडसकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकसेठ सामत, फुलचंद कराड, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, विनोद सामत, नामदेवराव आघाव, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, डाॅ. शालिनी कराड, शांतीलाल जैन, अरूण टाक, वृक्षराज निर्मळ, सुधाकर पौळ, सुरेश माने, श्रीराम मुंडे, वैजनाथ जगतकर, धम्मानंद मुंडे, शेख अब्दुल करीम, वहाजुद्दीन मुल्ला, केशव माळी, रमेश गायकवाड, राजाभाऊ दहिवाळ, विजय वाकेकर, सचिन कागदे, नारायण सातपुते, डाॅ. राजाराम मुंडे, माधवराव मुंडे, सुरेखा मेनकुदळे, उमाताई समशेट्टे, भारती कुलकर्णी, रमेश कराड, सुनील फड, पवन मुंडे, दत्तात्रय देशमुख, दासू वाघमारे, प्रकाश जोशी, अनिल तांदळे, महेश्वर निर्मळे, संदीप लाहोटी, वैजनाथ ताटीपामल, उमेश खाडे, योगेश मेनकुदळे, मोहन जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.
••••
Social Plugin