परळी वैजनाथ // वरद गणेश मंडळ आयोजित डॉ. राजाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 पासुन सुरू झालेल्या टोकवाडी फेस्टीव्हलचा झुकती है दुनिया या नाटकाच्या जोरदार नाटय प्रयोगाने शानदार समारोप झाला.
टोकवाडी येथे 1 जानेवारी रोजी लेखक दिग्दर्शक रानबा गायकवाड यांच्या झुकती है दुनिया या नाटकाचा रात्री 8 वाजता नाटय प्रयोग संपन्न झाला. वरद गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम मुंडे, सरंपच सौ. गोदावरीताई राजाराम मुंडे, उपसरपंच काळे, नामदेव मुंडे, मंचक सोळंके, ज्येष्ठ नाटक कलावंत केशव आघाव आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झुकती है दुनिया नाटकाचा नाटयप्रयोग संपन्न झाला. कलाकारांच्या प्रत्येक संवादाला ग्रामस्थांच्या जोरदार टाळया पडत होत्या. विनोदी व सामाजिक आशय असलेल्या या नाटकाने गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या टोकवाडी फेस्टीव्हलचा समारोप झाला.
या नाटकात सिनेनाटय कलावंत देविदास बोकन, प्रा. मारोती कांबळे, अनंत सोळंके, सिद्धेश्वर इंगोले, विकास वाघमारे, वर्षा कांबळे, चंदा चांदणे, विनायक काळेे, सिद्धांत लांडगे यांनी प्रमुख भुमिक साकारल्या. नाटकाचे संगीत सागर हनवते, नेपथ्य अनिल चिंडालीया , उत्कृष्ट निवेदन बालाजी कांबळे यांनी केले. कार्यक्रमास टोकवाडी व परिसरातील हजारो नाटय रसिकांची कडाक्याच्या थंडीत उपस्थिती होती
Social Plugin