आरोग्य मित्र व पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्यात रुग्णालयातील सर्वांशी संवाद
परळी येथील ज्येष्ठ सामाजिक नेते तथा परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून परळीतील पत्रकारांचा स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा संदर्भात अभ्यास दौरा काढण्यात आला होता. या दौऱ्यात आम्ही परळीतील सर्व पत्रकारांनी रुग्णालयाच्या प्रत्येक कक्षाची पाहणी केली तसेच उपचारातील पद्धत, वापरण्यात येणारी यंत्रणा याचा अत्यंत जवळून अभ्यास केला.
दिवसेंदिवस प्रदूषण व बदलत चाललेली जिवनशैली मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक ठरत असतांना दुसरीकडे वैद्यकीय सेवा महाग होत चालल्या आहेत. या पार्श्वभुमीवर आजारावर उपचार करण्यासाठी अनेक रुग्ण औरंगाबाद, नांदेड, लातूर, पुणे, मुंबई अशा महानगरात जात असतात. डॉक्टरीचा अभ्यास एकच, उपचार देणाऱ्या वैद्यकीय सुविधासुद्धा एकच असतात. परंतु आपल्या येथे उपचार होणार नाही… चला महानगरात जाऊ अशी एक पद्धतच झाली आहे. परंतु अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विविध वैद्यकीय उपचारासाठी अत्यंत परिपुर्ण झाले असून येथे हजारो रुपये खर्चाच्या विविध वैद्यकीय चाचण्या अक्षरश: मोफत होतात. एवढेच नाही तर या रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्षात दररोज 1800 पेक्षा अधिक रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असून उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही आता सुमारे 1200 पर्यंत पोहचली आहे. डायलेसीस, आयसीयु, ब्लड बॅंक, रक्त विघटन, प्लाझमा, प्लेटलेट्स, स्नेक बाईट, सिटी स्कॅन असे सर्व काही वैद्यकीय उपचार येथे उपलब्ध आहेत. थोडक्यात आपल्या जवळ एवढा मोठा दवाखाना असतांना आपण महानगराकडे उपचारासाठी का वळतो? असा प्रश्न निर्माण होतो. आम्ही या सर्वांचा आढावा घेण्यासोबत या रुग्णालयाला उच्च शिखरावर पोहचविणाऱ्या अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि त्यांच्या टीमसोबत संवाद साधला आहे.
स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई हे डोंगर पठारावर असून त्याला अंबाजोगाईतील जाणकार मंडळी वरचा दवाखाना म्हणून संबोधतात. या रुग्णालयात रोग निदान करणारी मोठी यंत्रणा व सुविधा उपलब्ध असून अद्ययावत सिटीस्कॅन, एक्स रे, सोनोग्राफी, सी.आर. सिस्टीम, येथे उपलब्ध आहे. सिटी स्कॅन मशिन हे 64 स्लाईस थ्री डायमेंशन सिकंस्ट्रक्शन असल्या कारणाने दवाखान्यातील सर्वात अद्ययावत मशिन आहे. विशेष म्हणजे सिटी स्कॅन करतांना आपल्या हाडाचे, स्नायुची सर्व कोनातून सहजपणे तपासणी करता येते. सिटी स्कॅनमुळे नेमका आजार कोठे आहे हे तपासून उपचार करण्यात मोठी मदत होते.
अपघात किंवा अत्यंत अत्यावस्थ रुग्णाला सर्वप्रमथम गरज पडते ती रुग्णालयाची आणि त्यानंतर त्याला लागते ते रक्त. साहजिकच रक्तासाठी आपण रक्तदाते शोधतो, आणि असा शोध चालू ठेवला तरीही किंवा नाही तरीसुद्धा आपल्याला अंबाजोगाईच्या रुग्णालयात कोणत्याही गटाचे रक्त सहजपणे उपलब्ध होऊ शकते. रक्त विघटन हा एक वैद्यकीय शास्त्रातील प्रकार असून रक्ताचे वेगवेगळ्या पद्धतीने विघटन करुन त्यातून प्लाझमा, प्लेटलेट्स, पेशी वेगळ्या केल्या जातात. जसा रुग्ण येईल त्या पद्धतीने त्याला रक्त किंवा पेशीचा पुरवठा केला जातो. अशी अद्ययावत रक्त प्रयोगशाळा आणि बॅंक औरंगाबाद नंतर केवळ अंबाजोगाईतच उपलब्ध आहे. आपण नेहमी रक्तदान शिबीर आयोजित करतो तेंव्हासुद्धा याच ब्लड बॅंकेतील मंडळी आपल्या मदतीला येत असते. एवढेच नाही तर रक्तदान केल्याचे ब्लड कार्ड दाखवल्यानंतरसुद्धा आपल्याला रक्त येथे मिळते. रक्तासाठी कोणतेही शुल्क नाही परंतु प्रयोगशाळेतील विविध प्रकारच्या तपासण्याचा आणि कोल्ड स्टोअरेजचा नाममात्र खर्च द्यावा लागतो.
अंबाजोगाईचे रुग्णालय खऱ्या अर्थाने अत्यंत परिपुर्ण रुग्णालय आहे. तज्ञ डॉक्टरांची मोठी फलटन येथे असून त्यांना अनेक शिकाऊ डॉक्टरसुद्धा मदत करतात. जोडीला आधुनिक पद्धतीची तपासणी यंत्रणासुद्धा येथे उपलब्ध आहे. याचसोबत विषबाधा व सर्पदंश (स्नेक बाईट) याचे रुग्ण आपल्या जिल्ह्यात अधिक असल्याने त्याच्यासाठी स्वतंत्र कक्षसुद्धा नियुक्त आहेत. याचसोबत हृदयरोग, श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, मधुमेह, स्वादुपिंड विकार, मुत्रपिंडाचे आजार, यकृत, रक्तदाब, मेंदूज्वर, बर्न (जळालेले रुग्ण) वार्ड, प्रसुती कक्ष, नवजात अर्भकांची तपासणी, डोळे, कान, नाक, घसा… असे एक नाही तर अनेक आजार असतात आणि अशा सर्व आजारांवर येथे उपचार केले जातात.
डायलेसीस हा वैद्यकीय शास्त्रातील एक महत्वाचा विभाग असून दररोज सुमारे 6 ते 7 रुग्णांची डायलेसीस येथे केली जातात. अद्ययावत यंत्रणा आणि तज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून होणारे डायलेसीस रुग्णांच्या उपचारातील महत्वाचा घटक ठरतो. म्हणूनच मोठी रक्कम महानगरातील रुग्णालयात यासाठी आकारली जाते. अर्थातच अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात नियमाशी अधिन राहीन त्यानुसार मोफत व नाममात्र दरात डायलेसीस केले जाते. या कक्षाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अधिक माहिती देतांना सांगीतले की, हा कक्ष 24 तास चालू असून केंव्हाही रुग्ण आल्यास त्याच्या अत्यावस्थेप्रमाणे तपासणीला प्राधान्य दिले जाते. याचसोबत विविध प्रकारच्या शस्त्रक्रीयेसाठी अंबाजोगाईच्या स्वा.रा.ति. रुग्णालयात विविध कक्ष आहेत. स्त्रीरोग विभागात दररोज 40प्रसुती होतात, पोटातील गोळा काढण्याच्या शस्त्रक्रीया एवढ्या संख्येने येथे होतात. अस्थिरोग विभगात फॅक्चर, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणके दुखी आदींचे उपचार येथे केले जातात. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर भोजराज हे महिन्यातून एकदा येथे येऊन शस्त्रक्रीया करतात अशी माहितीही डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. यासोबतच क्षयरोग म्हणजेच टी.बी. कक्षातही अद्ययावत मशिन तपासणी उपलब्ध झाली असून मानसिक आजार, डिप्रेशन, चिडचिडेपणा यावरही येथे उपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगीतले. बाह्यरुग्ण कक्ष दररोज सकाळी 9 ते 1 या वेळेत चालू असून आमच्याकडे थ्री टायर सिस्टीम असल्यामुळे कोणत्याही वेळी रुग्ण आला तरी त्याला उपचार मिळू शकतात असे ते म्हणाले. आम्हाला अंबाजोगाईसह अनेक ठिकाणच्या संस्थांनी मदत केल्यामुळे काही यंत्रणा आम्ही उभा करु शकलो. भविष्यात एमआरआय मशिन उपलब्ध करायची असून ऍन्जीओप्लास्टी, ऍन्जीओग्राफी करण्यासाठी कॅथलॅब सुरु करायचे आहे. बायपास सर्जरी अंबाजोगाईत उपलब्ध करण्यावर भर असून सुपर स्पेशालिटी कॅन्सर तपासणीसुद्धा येथे उपलब्ध करुन द्यायचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
बियाणीजी, आपला प्रयोग चांगला
आमचे अंबाजोगाईचे शासकीय रुग्णालय विविध वैद्यकीय सेवेने व तज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेने परिपुर्ण आहे. येथे औषधोपचारसुद्धा महानगराप्रमाणेच असूनसुद्धा दुर्दैवाने अनेक रुग्ण उपचारासाठी मोठ्या शहराकडे जातात ही आमची खंत असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख म्हणाले. आमच्या रुग्णालयाची उपलब्धता, सेवा सुविधा आपणास कळाल्या म्हणूनच आपण येथे भेट दिली. हा प्रयोग चांगला असून हे रुग्णालय आपले आहे हे जसे तुम्हाला वाटते अगदी तसेच सर्व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वाटावे, अशी अपेक्षा यावेळी चंदुलाल बियाणी यांच्याशी बोलतांना डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे हे रुग्णालय शासकीय असूनही सुमारे 5 तास डॉ. सुधीर देशमुख आमच्या सर्व पत्रकारांसोबत तसेच आरोग्य मित्र चे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव माधव ताटे यांच्यासोबत होते.
अनेकांचे मदतीचे हात
स्वा.रा.ति. रुग्णालय अंबाजोगाईला नेहमीच शासकीय मदतीचा ओघ येत राहीला. विशेषत्वाने याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन पुढे राज्याच्या आरोग्यमंत्री झालेल्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी मोठी मदत उपलब्ध करुन दिलेली आहे. त्या पाठोपाठ राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून अनेक नव्या यंत्रसामुग्री येथे आल्या आहेत. काही नवे कक्ष तसेच प्रयोगशाळा या केवळ डॉक्टर असलेल्या खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी मदत द्यावीच लागते हे समजता येईल, परंतु हे माझे रुग्णालय आहे, मला मदत करावीच लागेल ही लोकप्रतिनिधींची भावना महत्वाची आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात सेवा सुविधा व उपचाराबाबत अनेक मंडळी अत्यंत जागरुकतेने वावरतांना दिसून येतात. विशेषत: नंदकिशोर मुंदडा, संजय दौंड, राजकिशोर मोदी यांचा उल्लेख करावा लागेल. मानवलोकनेसुद्धा येथे चांगली मदत उपलब्ध केली असून अंबाजोगाईच्या पत्रकारांनीही मदत दिली आहे.
विद्यार्थी ते अधिष्ठाता प्रवास…
डॉ. सुधीर देशमुख स्वा.रा.ति.चे अधिष्ठाता आहेत. विशेष म्हणजेच याच महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम विद्यार्थी म्हणून पुर्ण केला, प्राध्यापक व प्रोफेसर म्हणूनही याच ठिकाणी त्यांनी काम पाहीले आणि आता ते अधिष्ठाता आहेत. विद्यार्थी ते अधिष्ठाता हा प्रवास थक्क करणारा असला तरी आम्ही येथील विद्यार्थी असल्यानेच आम्हाला रुग्णांवर उपचार करतांना भावनिक नाते जपावे लागते. केवळ मीच नाही तर अनेक डॉक्टर्स् जे येथे शिकले ते आज कार्यरत आहेत. आम्ही याच मातीत जन्मलो, शिकलो आणि वाढलो. म्हणूनच आपल्या मातीतील रूग्णांवर उपचार करतांना आम्ही आमचे कौशल्य पणाला लावतो असे डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगीतले. आपले रुग्णालय आपलेच आहे, ते मोठे आहे, सेवा चांगल्या आहेत, एकदा विश्वास ठेवा आणि उपचार घ्या असेही ते म्हणाले.
अत्यंत माफक किंवा जवळ-जवळ मोफत अंबाजोगाईच्या स्वा.रा.ति. रुग्णालयात विविध आजारांवर चांगले उपचार होत असतांना इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही. या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असून आवश्यकतेनुसार ऑक्सीजनसह रक्तही उपलब्ध होते. मुळात तज्ञ डॉक्टर व तज्ञ यंत्रसामुग्री येथे असल्याने परळी शहर व परिसरातील रुग्णांनी आपल्या आजारावर उपचार घेण्यासाठी अंबाजोगाईला भेट दिलीच पाहीजे असे आवाहन परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष यांनी केेले आहे.
अध्यक्ष चंदुलाल बियाणी 9422242433

Social Plugin