परळी // सध्याच्या वातावरणात लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यातून बदललेल्या सवयीमुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होत आहे. अपल्यासर्वांच्या व ग्रामीण भागातील कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी आणि मातृत्वाचे सुख वंध्यत्वाची समस्या असलेल्या महिलेला मिळवून देण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी साठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा रुग्णालयात स्थापित करण्यात आलेली आहे अशी प्रतिक्रिया डॉ.सौ.वैशाली भावठाणकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. श्री गजानन हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम, श्रीनिधी अड्व्हान्स लॅप्रोस्कोपी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा स्थलांतर व विस्तार कार्यक्रम दि.21 ऑक्टोबर 2018 रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली. परळीतील पाहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आपण परळीसारख्या तालुका स्तरावर आपण का देऊ शकत नाही? असा प्रश्न आम्हाला पडला आणि डॉ.सौ.वैशाली भावठाणकर यांनी विविध ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतले आहे आणि आज आमचे हे स्वप्न साकार होत आहे. टेस्ट ट्यूब बेबी ही अतीशय खर्चिक बाब आहे. आपल्या भागातील लोकांना ही सुविधा कमी खर्चात उपलब्ध व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे.
वंध्यत्वाची समस्या दूर करण्यासाठी बाहेरच्या शहरात उपचार घ्यायचे असतील तर साधारणपणे अडीच लाखांपर्यंत खर्च येतो. परंतु आपल्या तालुक्यातील नागरिकांना ही सुविधा आपण कमी खर्चात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ.सचिन भावठाणकर आणि डॉ.वैशाली भावठाणकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ.वैशाली म्हणाल्या की प्रदूषण, अनेक प्रकारचे व्यसन, जंक फूड, गरम वातावरणात केले जाणारे काम अशी व यासह अनेक कारणे वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात. परंतु त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मात करता येऊ शकते. वंध्यत्वाचे कारण शोधून त्यावर उपचार केल्यास वंध्यत्वाची समस्या दूर होऊ शकते असेही सांगितले आहे. या रुग्णालयात “युवा मदत फाऊंडेशन” साठी एका रुग्णावर मोफत उपचार करण्याचा मनोदय रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
Social Plugin