Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी तालुका स्तरीय खो-खो स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद !



परळी वैजनाथ | प्रतिनिधी..
   युवा क्रीडा संचालनालय म.रा. पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  बीड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये परळी येथे आज (दि.१०) तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना तालुक्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
          या स्पर्धेत मुलांच्या गटातून 14 वर्ष वयोगटात भेल सेकंडरी स्कुल परळी प्रथम व कैलास मा. विद्यालय तपोवन द्वितीय तर  सतरा वर्षे वयोगटात महाराष्ट्र विद्यालय मोहा प्रथम व न्यु हायस्कूल विद्यालय हिवरा द्वितीय आले. त्याचबरोबर मुलींच्या गटातून 14 वर्षे वयोगटात जि. प. शाळा हिवरा प्रथम व आश्रमशाळा कौडगाव हुडा द्वितीय आल्या आहेत.  तर सतरा वर्षे वयोगटात कैलास मा. विद्यालय तपोवन प्रथम व न्यु हायस्कूल मा. विद्यालय हिवरा द्वितीय आल्या आहेत. १९ वर्षीय वयोगटात मुलांचा गट पंडीतगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा प्रथम व रत्नेश्वर महाविद्यालय टोकवाडी द्वितीय आले आहे.
    परळी येथे आज तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या .या स्पर्धांचे उद्घाटन न.प. शिक्षण व क्रीडा समिती सभापती गोपाळ आंधळे यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा स्पर्धा तालुका समन्वयक बी.  व्ही.आनकाडे,  विलास आरगडे, प्रा.अतुल दुबे, विजय मुंडे, श्रीधर जाधव, मदन कराड, संजय देशमुख, चंद्रकांत चाटे,प्रा. डाॅ. जगदीश कावरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशन स्कूलचे प्राचार्य राॅय हे होते.यावेळी तालुक्यातील विविध शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. दिवसभरात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या.
       स्पर्धेतील अंतिम सामन्यांचे उद्घाटन व नाणेफेक पत्रकार संजय खाकरे, प्रा.रवींद्र जोशी , प्रवीण फुटके ,तालुका समन्वयक बी.व्ही. आनकाडे,फाउंडेशन शाळेचे व्यवस्थापक अरुण शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रिडा समन्वयक बी.व्ही.अनकाडे व त्यांच्या सर्व क्रीडाशिक्षक, सहकारी यांनी परिश्रम घेतले.