Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हिंजवडीतील 'त्या' पीडित मुलींच्या कुटूंबियांना खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी दिला धीर



शासकीय मदत तसेच आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी करणार प्रयत्न




पुणे // हिंजवडी (पुणे) परिसरात नुकत्याच झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या  कुटूंबियांची खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आज भेट घेतली व त्यांना धीर दिला. ' ताई, तुमच्या भेटीमुळे आम्हाला खरा आधार मिळाला आहे, आता तुम्हीच आमच्या माय-बाप आहात अशा शब्दांत पीडितेच्या पित्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, पीडितेच्या कुटूंबियांना         शासकीय सहाय्य करण्याबरोबरच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.

   राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या या अत्याचाराची गंभीर दखल घेतली आहे.  पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार  त्यांच्या वतीने खा. प्रितमताई मुंडे यांनी आज हिंजवडी परिसरात राहणा-या 'त्या' पीडितेच्या आई वडिलांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. 'तुम्ही काळजी करू नका, पंकजाताई तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहेत, झालेली घटना मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे यातील आरोपीला  कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या भेटीनंतर पीडितेच्या कुटूंबियांना धीर आला, ताई, तुम्ही भगिनीचं आमच्या आधार आहात, माझ्या मुलीला नक्की न्याय मिळेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.  दरम्यान,अत्याचारात मृत्यूमुखी पडलेल्या मुलींच्या कुटूंबियांची देखील खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडूनही त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली.

पोलिस आयुक्तांशी चर्चा व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
----------------------------
या घटनेसंदर्भात पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन् यांच्याशी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी यावेळी दूरध्वनीवरून चर्चा केली. घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत कठोर शिक्षा झाली पाहिजे,  त्यांना जामीन मिळता कामा नये असे त्या म्हणाल्या. ही घटना अतिशय संवेदनशील आहे, पीडितेला आयुष्यात पुन्हा उभा करायचे आहे, त्यामुळे  पसरविल्या जाणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  याप्रसंगी पुणे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अशोक मुंडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शैला मोळक, तळेगांवचे उप नगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रियंका बारसे, केशव घोळवे, रवि खेडकर, दिपक नागरगोजे, आबा नागरगोजे, संतोष राख आदी उपस्थित होते.
••••