मैदानी क्रीडा स्पर्धेत योगेश्वरीला अकरा बक्षिसे
अंबाजोगाई // तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत योगेश्वरी नूतन विद्यालयातील खेळाडूंनी दहा वैयक्तीक व रिलेरेसचे सांघिक असे अकरा बक्षिसे पटकावली .
बाल गटात श्रेयस रंधवेने अडथळा शर्यतीत प्रथम , रणजित देशमुख याने उंच उडीत व्दितीय, रोहन पिंपळेकर याने उंच उडीत प्रथम व शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला .
सतरा वर्षाखालील गटात निखिल देशमाने उंच उडीत प्रथम , विशाल पांचाळ तीन हजार मीटर चालणे मध्ये प्रथम आला .आदित्य आजगुंडे याने शंभर मीटर धावणेत दुसरा , विष्णू कराडने हातोडा फेकमध्ये दुसरा, आदित्य वाघमारे याने पाच किलोमीटर चालणे स्पर्धेत प्रथम व अमित मुंडे याने पाच किलोमीटर चालणेत दुसरा क्रमांक पटकावला.
.४X१०० मीटर रिले स्पर्धेत शाळेचा संघ प्रथम आला . त्यात यशवंत वीर , आदित्य आजगुंडे , विकास पवार , स्वराज कदम, अभय जाधव यांचा समावेश होता . खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा विभागप्रमुख आर .व्ही. सोनवळकर , प्रकाश मोरे यांनी केले .
विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाले , अॅड . शिवाजीराव कराड, अॅड .यु.बी. कामखेडकर, प्रा . माणिकराव लोमटे , मुख्याध्यापिका सौ . कुंदा व्यास, पदाधिकारी आलका साळुंके , पी.जी . गालफाडे ,एस .के. निर्मळे , अपर्णा पाठक , विलास गायकवाड व इतरांनी केले .
Social Plugin