Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

निधीची कमतरता भासु देणार नाही - ना.सौ.पंकजाताई मुंडे


विकास कामासंबधी नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे यांचे ना.मुंडे यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) प्रभागाचा विकास हेच भाजपचे उद्दीष्ट असुन त्या अनुषंगाने अंबाजोगाई शहराच्या महत्वपूर्ण अशा प्रभाग क्र. ५ मध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी कोणत्याही योजनेतील निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत राज्याच्या महिला बालकल्याण, ग्रामीण विकास मंत्री आणि बीड जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले
अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रभाग क्र.५ मधील कार्यतत्पर नगरसेवक डॉ.अतूल देशपांडे यांनी प्रभागाच्या विविध विकास कामासंदर्भात निवेदन देऊन ना. मुंडे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्या बोलत होत्या
पुढे त्या म्हणाल्या की,बीड जिल्हयाच्या विकासासाठी आपण बऱ्याच योजना खेचून आणल्या आणि ती कामे पूर्णत्वाकडे जात आहेत पुढील काळातही विकासाचे अनेक प्रकल्प आणि प्रलंबित कामे होतील नगरसेवक डॉ.अतूल देशपांडे यांच्या प्रभागात विकासरूपी कायापालट करण्यासाठी विवीध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यावर आपला भर राहील असेही त्यांनी सांगितले
सदरील प्रभागात भाजपाला मानणारा मोठा वर्ग असून इतर प्रभागापेक्षा वेगळया दृष्टीचा विकास होणे गरजेचे असल्याचे नगरसेवक डॉ. अतूल देशपांडे यांनी ना.सौ. मुंडे यांना सांगितले यावेळी पत्रकार राहूल देशपांडे उपस्थित होते