Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माझ्या स्वप्नातील आदर्श शिक्षक आणि शिक्षकांची व दशा

परळी-वै. (प्रतिनिधी) दि.07 :
    राष्ट्र व समाजाच्या जडण-घडणीत शिक्षकांचे सर्वाधिक योगदान असून एक ज्ञाननिष्ठ व कर्तव्यदक्ष शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमाने राष्ट्राची प्रगती साधू शकतो, असे उद्गार प्रा.डॉ.डी.व्ही.मेश्राम यांनी काढले.
    येथील वैद्यनाथ महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.व्ही.जे.चव्हाण हे होते. यावेळी व्यासपीठावर जवाहर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.दे.घ. मुंडे, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.जगतकर व प्रा.एस.एम.सूर्यवंशी, पर्यवेक्षिका प्रा.सुलभा वाघमारे यांची उपस्थिती होती. 
    शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी आपल्या उत्स्फुर्त भाषणातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे महत्त्व, त्यांचा कर्तव्यधर्म आणि समाजात त्यांचे बदलत चाललेले स्वरूप यासंदर्भात आपल्या बोलक्या भावना विषद करीत शिक्षकांचा मौलिक धर्म जागविण्याचा प्रयत्न केला. 
    यात एकूण दहा विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपले ऋण व्यक्त करीत राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान, माझ्या स्वप्नातील आदर्श शिक्षक आणि शिक्षकांची दशा व दशा या विषयावर विचार मांडले. यात कु.ऋतुजा स्वामी, कु.वैष्णवी मारुती आसेवार या दोघींनी प्रथम पारितोषिक पटकाविले. तर कु.प्रगती विष्णु गित्ते हिने द्वितीय तर कु.सेजल गोपाल मंत्री हिने तृतीय पारितोषिक मिळविले. विद्याथ्यांनी यावेळी उपस्थित प्राध्यापकांचा गौरव केला. प्रारंभी माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करून अभिवादन केले.
    व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पवित्र नातेसंबंध दृढ करण्यासोबतच ते वृद्धिंगत होऊन शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.  अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.चव्हाण यांनी शिक्षकांनी आपल्या उदात्त आचरणातून समाजासमोर आदर्श स्थापन करण्याचे आवाहन केले.
    संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.दे.घ. मुंडे व इतरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा.मनोज कांबळे, प्रा.अर्चना चव्हाण, प्रा.डॉ.पी.के.कोपार्डे, प्रा.मंगला पेकमवार(गडम), डॉ.नयनकुमार आचार्य, प्रा.दिलीप गायकवाड, प्रा.डॉ.वीरश्री आर्य, प्रा.शेटे, प्रा.भालेराव, प्रा.चाटे, प्रा.ढाकणे, प्रा.नांदेडकर, प्रा.पद्मवार, प्रा.भोकरकर, प्रा.बीडगर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.आचार्य यांनी तर सूत्रसंचालन कु.मंजुश्री घोणे यांनी केले. तर आभार कु.प्रगती गित्ते हिने मानले.