Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

समाजात समानता, नैतिकता आणि अध्यात्मिक या गोष्टी वाढीस लागल्या तर उदारमत वादाची वृध्दी होईल - लक्ष्मीकांत देशमुख


अंबाजोगाई // देशात आज अनेक प्रश्न भेडसावत आहेत यावर उदारमतवादातूनच उत्तर देता येते त्यासाठी चळवळी महत्वाच्या आहेत कारण त्यातून उदारमतवादाचा विकास होतो असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले
येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव गणपत व्यास होते
पुढे बोलताना देशमुख म्हणाले सध्या उदारमतवादाची पिछेहाट होत असल्याचे मानले जात आहे २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर उदारमतवाद धोक्यात आला अशीही टिपण्णी होतेआहे प्रामुख्याने संकुचित वातावरण असले की त्याचा परिणाम उदारमतवादावर होतो त्यासाठी योग्य वातावरण तयार करून उदारमतवाद सर्व स्तरापर्यत पोहंचण्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे
समाजात समानता, नैतिकता आणि अध्यात्मिक या गोष्टी वाढीस लागल्या तर उदारमत वादाची वृध्दी होईल
देशामध्ये लोकेच्छा, घटनात्मक कारभार आणि कायदयाचे राज्य या गोष्टी कशा वापरल्या जातात यावरही उदारमतवादाची संकल्पना स्पष्ट करता येते व्यक्ती स्वातंत्र्य,व्यक्तीच्या परस्पर हिताचे रक्षण करणारे राजकारण या गोष्टी जर वाढीस लागल्या तर उदारमतवाद देखील वाढेल आणि सुराज्य प्रस्थापित होईल असेही देशमुख म्हणाले
प्रारंभी संस्थेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ.यु.डी. जोशी, उपप्राचार्या डॉ.बी. एल. देशमुख    यांनी केले
प्रा.डॉ. गणेश पिंगळे यांनी संचालन करून आभार मानले  या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, संचालक, विवीध विभागातील कर्मचारी, विद्यार्थी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते