Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संस्कृतीतून ज्ञानाचे बीजरोपण करण्यासाठी गणेशव्याख्यानमालेचे आयोजन



अंबाजोगाई // येथील योगेश्वरी शिक्षण संस्थामध्ये सर्व  कर्मचारी बांधवांच्या वतीने गणेशशोत्सवानिमित्त " श्री . गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यातआले असून  , या व्याख्यानमालेत नामवंत विचारवंतांची व्याख्याने होणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाळे व सचिव अॅड .यु.बी. कामखेडकर यांनी दिली आहे . नागापूरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानामालेला सुरुवात होईल .दि. १४ शुकवारी  पुणे येथील अन्वर राजन यांचे " सहिष्णुता " या विषयावर , दि.१५ शनिवारी जळगाव येथील अविनाश पाटील हे " वैज्ञानिक दृष्टीकोनातून भारतीय नागरीकत्व " या विषयावर विचार मांडतील .
दि.१७ सोमवारी  उस्मानाबाद येथील सतीश कदम हे " हैद्राबाद मुक्ती  संग्रामाचा लढा " , दि.१८ मंगळवारी  बालाजी सुतार हे " अराजक मातलं आहे चौफेर ", दि. १९ बुधवारी नांदेडचे मधुकर धर्मापुरीकर हे " व्यंगचित्र अस्वाद व अनुभव ", दि. २० गुरुवारी  रोजी पुणे येथील लक्ष्मीकांत देशमुख यांचे " उदारमतवादी ", दि.२१ शुक्रवारी पुण्याचे डॉ . शमसुद्दीन तांबोळी हे " तिहेरी तलाकचा तिढा", दि. २२ शनिवारी पुण्याचे प्रमोद मुजुमदार हे " सलोख्याच्या वाटेवर " याविषयावर व्याख्यान देणार आहेत .तरी या व्याख्यान मालेला सर्व
नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे अवाहन संयोजकांनी केले आहे .