34 वर्षानंतर वर्गमिञानी शिक्षक व शिपाई मामाचा केला गौरव
आष्टी (प्रतिनिधी )
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर जिद्द,सचोटी व मेहनतीला पर्याय नाही. आष्टी येथील जिल्हा परिषदेचे मुलांचे हायस्कुलमध्ये शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे. राजकारण ,समाजकारण ,प्रशासकीय सेवा, डाॕक्टर , वकील ,पञकार , इंजिनिअर , व्यापार ,शिक्षण ,कला ,क्रिडा ,साहित्य , अभिनय ,आदि क्षेत्रात नाव कमविलेले आदर्श विद्यार्थी ,आदर्श नागरिक ,आदर्श शिक्षक ,प्राध्यापक , समाजसेवक घडले आहेत. आम्हाला यांचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन हायस्कुलचे सेवानिवृत पर्यवेक्षक डी.जी.देशपांडे यांनी केले.
आष्टी येथील जि.प.मुलांचे हायस्कुलमधील सन 1983 - 1984 च्या 10 वी.मधील बॅचच्या विद्यार्थ्यांचा मेळावा काल सोमवार दि.10 सप्टेबंर रोजी उत्साहात पार पडला.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन देशपांडे बोलत होते.
यावेळी क्रिडा शिक्षक दिगांबर खांडके, एस.व्हि.देशपांडे ,संभाजी नवसुपे ,गंगाधर भागवत ,रेखाताई आगरकर ,चिञकला शिक्षक शेख फरीद , शिपाई केशव साळवेमामा हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना ,राष्ट्रगीत , परिपाठ ,राष्ट्रभक्तीपर गीत गायन झाले. सरस्वती पुजन झाले.यावेळी गंगाधर भागवत यांनी हायस्कुलमधील आठवणी ,शाळेचा 40 वर्षाचा प्रवास ,शाळेची सध्यस्थिती, वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. सुरुवातीच्या काळात हायस्कुलमधील भौतिक सुविधा उपलब्ध नसताना आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेबरोबरच गावाचेही व आपले नाव उज्ज्वल केले. आता काळानुरूप शाळेच्या ईमारतसह इतर बदल झाले आहेत. या वाटचालीत माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा मोठा वाटा आहे. यावेळी दिगांबर खांडके यांनी आपण क्रिडा क्षेत्रात बरेच विद्यार्थी घडविले ते वरिष्ठ प्राध्यापक झाले. खेळाडू झाले असे सांगुन भावुक झाले.
शेख फरीद म्हणाले 1984 च्या आधीचे शिक्षण व नंतरचे शिक्षण यात मोठे अंतर आहे. आता बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणात एक प्रकारचा साचेबद्धपणा आला आहे. त्यापूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन जीवनात त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धाडस शाळेतूनच मिळत होते. आता त्यात बदल झाला आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवितानाच कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक जबाबदारीचीही जाणीव ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डी.जी.देशपांडे ,दिगांबर खांडके ,एस.व्हि.देशपांडे ,जी.एम.भागवत ,संभाजी नवसुपे ,शेख फरीद ,रेखाताई आगरकर यांची भाषणे झाली.
यावेळी मंगेशदेवा जोशी ,प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे ,लेखापरिक्षक गौतम निकाळजे ,डाॕ.राजेंद्र सानप ,बाळासाहेब शिंदे ,अतुलशेठ मेहेर , प्रमोद बोरा ,सुधाकर मुंडे ,प्रा.दत्ताञय सायकड यांची भाषणे झाली.
या स्नेहमेळाव्यास आष्टी तालुका शिक्षण संस्थेचे सचिव अतुलशेठ मेहेर , नगरसेवक शिवाजी उर्फ बाळासाहेब शिंदे , प्रा..बाळासाहेब धोंडे , मंगेशदेवा जोशी ,पांडुरंग धोंडे ,आय्युबभाई शेख,ओम मलभागे,झुंजारनेताचे वरिष्ठ पञकार उत्तम बोडखे ,प्रा.दत्ताञय सायकड ,शेख लतीफ,अस्फाक पठाण ,डी.बी.पवार ,ॲड.सुधाकर मुंडे , प्रमोद बोरा ,श्रीकांत देशमुख ,मोहन दिवटे, दत्ताञय तावरे, रामकिसन शिनगारे ,ॲड.सुभाष बन,किसन गुळवे ,सुहास सरदेशमुख ,राजेंद्र तांबे,सुनिल काकडे ,शिरीष लगड,राजेंद्र सानप , नितीन आष्टेकर , संजय कुलकर्णी ,दत्ता आष्टेकर आदि माजी विद्यार्थी उपस्थित होते.संचलन अतुलशेठ मेहेर तर आभार नगरसेवक बाळासाहेब शिंदे यांनी मानले.
तब्बल 34 वर्षांनी एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी यावेळी एकमेकांची गळाभेट घेतली . जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांची मैफल चांगलीच रंगली.
यावेळी 15 माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
-------------
आई-वडिलांना विसरू नका जीवनात शिक्षक गुरुस्थानी असले तरी जन्मदाते आई-वडील हे आद्यगुरू आहेत.त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टातून, केलेल्या त्यागातून उतराई होणे अशक्य असते. एकवेळ यश,पैसा,कीर्ती मिळविणे सोपे आहे.
* गंगाधर भागवत
(सेवानिवृत्त शिक्षक)
----------------------------------------
Social Plugin