Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विभागिय पातळीवरील क्रीडास्पर्धेत बीड जिल्ह्याच्या संघात 5 पैकी पहिले 3 खेळाडू योगेश्वरी नूतन विद्यालयाचे विद्यार्थी

   

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विदयालयचे  वर्चस्व
परळी //येथे आयोजित आंतर शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत बुद्धिबळ १७ वर्षाखालील मुलांच्या गटात योगेश्वरी नूतन विद्यालयाने चि.कौस्तुभ बाभूळगावकर, शिवम कांदे, सार्थक तपसे या 3 खेळाडूने प्रथम पारितोषिक पटकावले. व
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले.

विभागिय पातळीवरील क्रीडास्पर्धेत बीड जिल्ह्याच्या संघात 5 पैकी पहिले 3 खेळाडू योगेश्वरी नूतन विद्यालयाचे विद्यार्थी
असून  अंबाजोगाईच्या वैभवात
योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या या खेळाडूंनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून मानाचे स्थान प्राप्त केले . विजयी खेळाडूंना शाळेतील क्रीडाविभाग प्रमुख रमण सोनवळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, अॅड. शिवाजीराव कराड, अॅड. यु. बी. कामखेडकर, प्रा. माणिकराव लोमटे , मुख्याध्यापिका के.टि. व्यास, अ.डब्लू.साळुंके, पर्यवेक्षक एस. के. निर्मळे, सौ.पाठक, मंदिर विभागप्रमूख  पी.जी.गालफाडे,यांनी  अभिनंदन केले. तसेच तपके सर्वश्री आंकडे,विजय मुंडे,पापासर,उमेश आठवले व इतर मान्यवरांनी खेळाडूचे व मार्गदर्शक रमण सोनवळकर सरांचे अभिनंदन केले