किल्लेधारु// येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर ,येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केरळ येथील नैसर्गिक आपत्ती पूरग्रस्त लोकांसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी धारूर शहरात फिरून मदत निधीचे संकलन केले या निधी संकलनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ. शिवदास शिरसाठ यांनीही दिला. या निधी संकलनाच्या कार्यक्रमात धारूर शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व त्यात रुपये 13234 रुपये असा निधी संकलित झाला. तो निधी केरळ सरकारला हस्तांतरित करण्यात येईल या. कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ ,उपप्राचार्य डॉ. माणिकराव तट तसेच दुसरे उपप्राचार्य प्रा.महादेव जोगडे. तसेच क्रीडा विभाग प्रमुख प्रा. भारत पल्लेवाड राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.नागोराव वाघमारे डॉ. दिगंबर गंजेवार, डॉ. वृषाली कुटे तसेच प्रा. ए डी सावंत डॉ .देसाई प्रा.चौधरी , प्रा.राउत, प्रा.लोखंडे प्रा.वैरागे महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होऊन ,निधी संकलनाचे कार्य पूर्ण केले.
Social Plugin