Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आपले सरकार’मुळे अमूल्य वेळ वाया


 मुंबई //सर्वसामान्य लोकांना आपली गा-हाणी सरकारकडे मांडायची असतात. अशी गा-हाणी सहजपणे मांडता यावीत म्हणून राज्य सरकारने ‘आपले सरकार’ सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. मोठा गाजावाजा करून सरकारने सुरू केलेली ही सुविधा आता मात्र ढेपाळली आहे. ढेपाळलेली ही सुविधा अधिकारी वर्गासाठी मात्र मोठी डोकेदुखी ठरत आहे.

तांत्रिक दोष असल्यामुळे ‘आपले सरकार’ सॉप्टवेअर वेगाने काम करीत नाही. ‘आपले सरकार’प्रमाणेच केंद्र सरकारचेही ‘पी. जी. पोर्टल’ हे सॉप्टवेअर कार्यरत आहे. पण केंद्राचे सॉप्टवेअर फारच वेगाने व प्रभावीपणे काम करते. याउलट राज्याचे सॉप्टवेअर वेळखाऊ आहे.

तक्रारदाराकडून आलेल्या माहितीची पडताळणी करून ती संबंधित सरकारी यंत्रणेकडे पुढे पाठवताना बराच वेळ लागत आहे. आम्हा अधिका-यांना कामाचा मोठा व्याप असतो. मिनिटाचा वेळही महत्वाचा असतो. अशा स्थितीत वेळखाऊ ‘आपले सरकार’मुळे अमूल्य वेळ वाया जात आहे. मंत्रालय स्तरावर हे सॉफ्टवेअर त्रास देत आहे, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिका-यांसाठी तर ते मोठी डोकेदुखी ठरली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने ही तांत्रिक चूक दुरूस्त करायला हवी. केंद्राच्या पी. जी. पोर्टलप्रमाणे जर हे सॉफ्टवेअर काम करू लागले तर आम्हा अधिका-यांचा बराच वेळ वाचेल, अशी भावना या अधिका-यांनी व्यक्त केली.