दिल्ली // देशाच्या राजकीय इतिहासातील 'अटल' अध्यायाच्या पानावर शेवटचा निशब्द अशी भावना व्यक्त होतेय. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयीयांना 11 जून 2018 रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 66 दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते.
वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. वाजपेयी यांच्या निधनामुळे सर्वांना सोबत घेऊन चालणारा सहिष्णू नेता हरपल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Social Plugin