Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजकारणात होणा-या बदलाला तयार असणा-या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल-शरद पवार

मुंबई- 2019मध्ये होणाऱ्या

लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपाला पर्याय देईल. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला चिंता नाही. काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही. ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल, असंही पवार म्हणाले आहेत. राजकारणात होणा-या बदलाला तयार असणा-या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असं मत पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. या आधी राहुल गांधी यांनी काँग्रेसला जागा मिळाल्या तर मीच पंतप्रधान होणार असं वक्तव्य केलं होतं. परंतु राहुल गांधींनीच मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही पुढे केलं आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनताच पर्याय देईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.