पुणे : दहशतवादीविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) डाॅ.नरेंद्र दाभोलकर व गौरी लंकेश यांच्या खुना प्रकरणी काही संशयित हिंदुत्ववादी कार्यकर्तांना अटक केली आहे.या अटकेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असुन राज्य सरकारने बंदीचा प्रस्ताव क्रेंदाकडे पाठवण्यात आला आहे.
यामुळे आज पुणे येथे सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यान चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली.हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले हे मिडियाशी बोलताना म्हणाले की,डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही.आम्ही कोणत्याही परिस्थितीत सनातन व आमच्या संस्थेवर बंदी आणू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन करून लढा उभारला जाईल.
Social Plugin