Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्रावणमास तपोनुष्ठान अंतर्गत आरोग्य मोफत तपासणी शिबीर


पाच दिवसात 3,800 रुग्णांची तपासणी, 68 रुग्णांवर झाल्या मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया

परळी //   येथील  श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, लिंगायत समाज व भक्तगण परळी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान निमित्त येथील वैद्यनाथ मंदिराच्या नवीन ईमारतीत लाईफ केअर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंन्टर उदगीरच्या वतीने सुरु केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात आतापर्यंत 3,800 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीरात 68 रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली.
      या शिबीरातील मुळव्याध (55) रुग्ण, मुतखडा (35) , लघवीला त्रास होणे (80), गर्भशयाच्या पिशवीचे ऑपरेशन(15), हार्निया (32),  अपेंडिक्स (21), थॉयराईड (10), डायलसीस (15), कानाची मशीनचे (75) रुग्ण उदगीरच्या सेंटर शस्त्रक्रियेसाठी येणार आहे. या रुग्णांची घेऊन जायची सोय तसेच जेवण, राहणे, व शस्त्रक्रिया मोफत करण्याची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती या शिबीराचे प्रमुख डॉ.बसवराज मलशेट्टी यांनी परळीत बोलतांना दिली.
    12 ऑगस्ट पासुन सुरु झालेले हे मोफत आरोग्य शिबीर परळीत1 2 सप्टेंबर पर्यंत चा
लणार आहे. लाईफ केअर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंन्टर उदगीरच्या अध्यक्षा डॉ.सौ.अर्चना पाटील चाकुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसर