Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आज हरंगुळ येथे नागपंचमी निमित्त यात्रा महोत्सव



परळी वैजनाथ  //नागपंचमी यात्रा महोत्सव हरंगुळ ता.गंगाखेड येथे राजार्भृतहरीनाथ महाराजांची प्रतिवर्षाप्रमाणे  याहीवर्षी दिनांक दि.14 ते 15/08/2018 रोजी वार बुधवार या दिवशी यात्रा भारणार आहे.

या यात्रेनिमित्त्य हरंगुळ ता.गंगाखेड, जि.परभणी हे नवनाथापैकी एक ओम चैतन्य सदगुरू राजाधिराज योगीराज भ्रतहरीनाथ नवनाथ पारायण दि. 11 ते 14 आँगस्ट 2018 पर्यंत भव्य दिंडी भजन तसेच 12 वाजता आरती होते. त्या दिवशी महिला, पुरुष, लहान मुले, वारूळांची व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दि.15 रोजी नागपंचमीच्या दिवशी सकाळी 6.30 वाजता आरती होते. दर्शनासाठी रांगा लागतात. श्री भ्रतहरीनाथाची
पालखी मिरवणूक ठिक 11 वाजता निघते.ही पालखी दक्षिणदाराने निघुन पुर्वेकडे राज्यमार्गाने जावून (राजमार्गस्थनी) पश्‍चिमेस वरील गावां बाहेरील समाधीकडे जावून नंतर सदर बाजार रस्ता येतो. त्यावेळी पालखी समोर टाळ मृदंग तसेच येथे रस्त्यावर खेळ, भारूड इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्या दिंडीत हजारो भाविकांची व महाराजांची भारताच्या कानाकोपऱ्यातुन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दुपारी 2.30 वाजता पालखी मंदिरात येते. मंदिराच्या गाभाऱ्यात मंदीरांचे अध्यक्ष तहसीलदार साहेब व पूजारी सुभाष भोकरे यांच्या हस्ते श्री ची महापुजा व आरती होते नंतर सर्वांना दर्शनास परवानगी मिळते मंदीर खुले केले जाते. काशीच्या वाटीत दुध ठेवले जातात व नागाच्या रूपात दुध प्यायला भ्रतहरीनाथ येतात. ते पाहण्यासाठी अनेक भक्तांची गर्दी होते. या यात्रेत खेळणीचे स्टँल तसेच विविध प्रकारचे मिठाईचे दुकान असतात. दुपारी 3 वाजता कुस्ती स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. तसेच नंतर गावा बाहेरील मैदानावर कुस्तीचे खेळ केले जातात.  तसेच या यात्रेत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशी माहिती ग्रामपंचायत कार्यालय हरंगुळ यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हणटले आहे.