Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विवेक आणि विश्वासाचा समन्वय म्हणजे श्रीगणेश-प.पु.माता कनकेश्वरी देवीजी

कार्तिक-गणेश कथा श्रवणाने भाविक मंत्रमुग्ध

आपला ई पेपर/परळी/प्रतिनिधी



कुठल्याही देवाची पूजा अर्चा करतेवेळी माणसाचा विवेक जागृत असला पाहिजे विवेक व विश्वासाचे समन्वय म्हणजे श्री गणेश असून श्री गणेश व कार्तिकेय यांच्या जन्माची कथा या भगवान शंकराच्या लीला असल्याचे प्रतिपादन माता कनकेश्वरी देवीजी यांनी परळी येथील हलगी गार्डन येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथेत मंगळवारी केले.

 पंचम ज्योतिर्लिंग परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे सातवे पुष्प गुंफताना माता पार्वती व भगवान शंकराच्या कार्तिक व श्री गणेश या दोन्ही मुलांच्या जन्म कथा सांगितल्या. कुठलेही दास हे खास बनल्यावर त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते ते आपल्या स्वामीच्या निर्णयाऐवजी स्वतः निर्णय घेऊ लागतात भगवान शंकराचे दास खास झाल्याने त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला होता यातूनच श्री गणेश जन्माची लीला भगवान शंकराने रचली. श्री गणेशाचा जन्म हा तीन कारणासाठी झाला यात माता पार्वतीने केलेले तप, सर्व शिष्यामध्ये आलेला अहंकार व माता पार्वतीची काली-गौरी ही रुपे कारणीभूत आहेत.श्रीगणेश विवेक व विश्वासाचा समन्वय होय.कुठल्याही भक्ताने सेवाधर्म सोडु नये. माणसाला प्रशंसा हवीहवीशी वाटू लागली की सेवा धर्मात चुका होतात साधनांमध्ये जेव्हा निष्ठा शक्ती येत असते तेव्हा त्याला कोणीच जाग्यावरून हलवू शकत नाही परंतु खास बनवण्याच्या नादात भक्तामध्ये अहंकार निर्माण होतो आणि यातूनच स्पर्धा निर्माण होत असल्याचे सांगितले श्री गणेश व कार्तिक यांच्या लग्नाबद्दलची कथा सविस्तरपणे सांगितले. रिद्धी व सिद्धी या केवळ नावे नसून रिद्धी म्हणजे भौतिक सुखातील संपत्ती तर सिद्धी म्हणजे समता कडे असलेली विवेक संपत्ती होय.

@आज सांगता

बुधवार दि.६  नोव्हेंबर पासून परळी येथील हालगे गार्डन येथे सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांच्या आयोजनाखाली सुरू असलेल्या प.पु.माता कनकेश्वरी देवीजी यांच्या शिवमहापुराण कथेची बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे.