Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वेगवेगळ्या फंडातून शहरात १५०० विंधनविहीरी घेतल्या... तरी नियोजना अभावी परळीकरांना दुष्काळाच्या सोसाव्या लागतात झळा..

 परळी वैजनाथ /आपला ई पेपर  


गेल्या दोन महिन्यांपासून दुष्काळाच्या झळा लागत असून दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. अनेक गावात विहीरी व विंधनविहीरी अधिग्रहण केल्या आहेत. तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. असे असताना लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात तर अधिकारी, कर्मचारी निवडणूक यंत्रणेत गुंग आहेत. दुष्काळ जाहीर झालेला असताना उपाययोजना मात्र केल्या जात नाहीत यामुळे नागरीकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.

     परळी शहर हे पाण्यावर उभे आहे.  शहराला कधीच पाणी कमी पडत नाही अशी येथील रहिवाशांची धारणा होती. शहरात कधीकाळी दिवसातून दोन वेळेस पाणी पुरवठा केला जात असे. जसजशी शहराची लोकसंख्या वाढत गेली तसतसे शहरात नगरपालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी एक वेळ सोडण्यात येवू लागले. पण मागील काही वर्षांपासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शहराला  पाणी पुरवठा करणारे नागापुरचे वाण धरण दिवसेंदिवस कोरडे पडत गेले दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येवू लागला नंतर चार दिवसाआड तर मागील काही महिन्यांपासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.



 दरम्यान नगरपालिका, नगरसेवक व येथील लोकप्रतिनिधींनी मागील काही वर्षात जो दुष्काळ पडत गेला वेळोवेळी शहरात विविध वार्डात विंधनविहीरी घेतल्या. नगरपालिकेने तर आजपर्यंत जवळपास ७०० ते ८०० विंधनविहीरी घेतल्या आहेत... फंडातून वेगळ्या म्हणजे शहरात १२०० ते.१५०० विंधनविहीरी घेतल्या गेल्या आहेत. मात्र या विंधनविहीरी जोपर्यंत सुरू आहेत तोपर्यंतच याकडे लक्ष दिले जाते. ज्या व्यक्तीला जेंव्हा आवश्यकता आहे त्यावेळी बटण दाबून लगेच पाणी घेतले जाते. शासकीय योजनेतून सुरू असलेल्या विंधन विहिरी जणू काही स्वतःच्या बा..ची ज जागीरदारी असल्यासारखे काहीजण काही ठिकाणी या नगरपालिकेच्या बोअरवर हक्क गाजवत आहेत.

पाणी भरणे झाले तरी किती तरी वेळ तसेच सुरू राहते कारण पाणी असले की त्याची किंमत नसते. बेसुमार पाणी उपसा होत असतो. पण ज्यावेळी विंधनविहीरी बंद होतात तेव्हा याला कोणीच लक्ष देत नाही. नेहमीच मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत काहीतरी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.


 परतीच्या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण ७० टक्के भरले होते.यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असे वाटले पण शहरातील विंधनविहीरी दिवसेंदिवस बंद पडत चालल्याने सर्वांची भिस्त नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यावर आली आहे. नगरपालिका पाच दिवसाआड पाणी पुरवठा करत आहे.


 जोपर्यंत बोअरवेल सुरू होत्या तोपर्यंत पाच दिवसाआड पाणी आले तरी पुरत होते पण आता मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावभागात ज्याठिकाणी एखादी बोअरवेल सुरू आहे याठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर पाणी भरण्यासाठी गर्दी करत आहेत. तसे पाहता आता विंधनविहीर बंद पडत असल्याने नगरपालिकेने दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा करणे आवश्यक झाले आहे. 

ग्रामीण भागात तीन वर्षानंतर पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.  पिकांनाही आवश्यक तेवढा पाऊस न पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. यंदा पावसाने जून महिन्यांपासूनच ओढ दिली. पावसाळा पाऊस पडला नाही. यामुळे शेतीच्या बाहेर पाणी आले नाही. ना नद्या, नाले, ओढे भरून वाहीले. मागच्या वर्षी तालुक्यातील सर्वच लहानमोठे प्रकल्प ओसंडून वाहत होते. यंदा मात्र हे प्रकल्प कोरडे पडत चालले आहेत. तालुक्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पात जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या मानाने पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई व शेतात चारा टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला पण लोकसभा निवडणूक असल्याने दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष देण्यास  ना अधिकारी, कर्मचारी कारण नेते प्रचारात तर अधिकारी निवडणूक यंत्रणेत गुंतले आहेत यामुळे शेतकरी, दुष्काळी परिस्थिती वाऱ्यावर उडाली आहे.

----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या