Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा पब्लिक स्कूलची सीबीएसई क्लस्टर -IX व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदी निवड


सिंदफणा पब्लिक स्कूलची सीबीएसई क्लस्टर -IX व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदी निवड

आपला@पेपर | माजलगाव

नवी दिल्ली कडून माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  सीबीएसई क्लस्टर - IX व्हॉलीबॉल १९वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदी निवड करण्यात आली आहे.

सीबीएसई ने स्पोर्ट्स कॅलेंडर नुकतेच पारित केले असून सीबीएसई क्लस्टर IX हॉलीबॉल 19 वर्षा वयोगटाखालील मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदी सिंदफणा पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली आहे.

सी.बी.एस.ई द्वारे ८ ते ११ डिसेंबर दरम्यान ४ दिवसीय क्लस्टर - IX व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतील.

या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील १९वर्षांखालील मुले आणि मुलींचे सुमारे ७० संघ सी. बी.एस.ई. शाळेतील १००० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा सीबीएसई नवी दिल्ली च्या नेमून दिलेल्या निरीक्षक यांच्या निरीक्षणामध्ये पार पडणार आहे.
अशा प्रकारची स्पर्धा '  आहे.

या स्पर्धेतील विजयी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे खेळाडू राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेत सहभागी होतील.

सिंदफणा पब्लिक स्कूल मध्ये होणाऱ्या या क्लस्टर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी सीबीएसई पुणे विभागाचे विभागीय अधिकारी  राम वीर सर,माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके,जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंग भैया सोळंके, सिंदफणा पब्लिक स्कूलच्या सचिव तथा जिल्हापरिषद सदस्या मंगलाताई सोळंके, माजलगाव वस्त्रोद्योग संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विरेंद्र दादा सोळंके,बीड जिल्हा सीबीएसई समन्वयक  शितल सर्वज्ञ,समन्वयीका नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, बीड जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळांचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत. सिंदफणा पब्लिक स्कूल ला सीबीएसई IX क्लस्टरसाठी क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याबद्दल सिंदफणा पब्लिक स्कूल चे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून येणाऱ्या सर्व स्पर्धक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी सिंदफणा शाळेचे क्रीडा संचालक श्री दिपक माने यांच्याशी +९१ ८२७५९४२३९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य अन्वर शेख यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/ix.html