बीड // संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील वादग्रस्त जागेप्रकरणी कोणत्याही क्षणी निकाल लागू शकतो.अयोध्येचा जो काही निकाल असेल तो कोणत्याही पक्षाचा नाही. किंवा कोणत्याही धर्माचा नसून तो निकाल न्यायालयाने दिलेला असेल त्यामुळे बीडकरांनी न्यायालयाचा निकाला प्रमाण माणून तो स्विकारावा असे अवाहन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.
निकालानंतर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून निकालानंतर सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, झालेच तर ही परिस्थिती कशी हाताळावी, काय काळजी घ्यावी, आतापासून काय उपाययोजना कराव्यात याबाबत पोलिस दल सक्रिय झाले आहे. प्रत्येक शासकीय निमशासकीय अधिकार्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.
ते पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अयोध्येचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो त्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवार दि. ५ रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेचे अयोजन केले होते. अयोध्या येथील वादग्रस्त जागेप्रकरणी सुनावणी पूर्ण झालेली असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यापूर्वी हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अयोध्याप्रकरणी निकाल हाती येईल अशी स्थिती आहे. सोमवारी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ठाणे प्रमुख आणि गोपनीय शाखेच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या निकालाकडे सार्या देशाचे आणि जगाचेही लक्ष लागले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आदर राखणे आणि शांतता कायम ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निकालानंतर कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कुणाच्याही भावना दुखावणारा कोणताही मुद्दा उपस्थित केला जाऊ नये, जातीय सलोखा निर्माण होईल अशा पोस्ट, व्हीडीओ व्हायरल करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
१९९२ ला उमटलेल्या पडसादातील आरोपींच्या शोधात पोलिस
१९९२ ला अयोध्येमध्ये झालेल्या प्रकारानंतर जिल्ह्यात त्याचे मोठे पडसाद उमटले होते. या प्रकरणातील आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. तर १९९२ ला बीड, माजलगाव, पात्रुड, आणि परळी येथे मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद उमटले होते. सध्या तेथे पोलिसांचा कडक पाहरा आहे. तर प्रत्येकांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे कोणीही जातीय तेढ निर्माण होईल असे एसएमस शेअर करु नयेत.
एसटी महामंडळाच्या अधिकार्यांची घेणार बैठक
कोणत्याही घटनेमध्ये लक्ष केले जाते ती म्हणजे ‘लाल परी’ त्यामुळे अयोध्येच्या निकालानंतर त्याचे पडसाद उमटले जाणार नाहीत. यासाठी पोलिस प्रशासना पूर्ण तयारीत आहे. मात्र तरीही काही प्रकार घडला तर त्याला नियंत्रणात कसे आणायचे त्यासाठी महामंडळाच्या चालक वाहकांनी कोणत्या सुचनेचे पालक करायचे त्यांना कसे संरक्षण द्यायचे या संदर्भात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार चर्चा करणार आहेत.


Social Plugin