मुंबई // शहरातील अनेक केंद्रांवर विधान सभा मतदान प्रक्रिया पार पडली..त्यावेळीअनेक केंद्रावर अपुऱ्या सुविधांची अभाव दिसून आला. नगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळा जिथे कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना त्या जागेचा ok रिपोर्ट देणारे कोण ? त्या ठिकठिकाणी मतदान केंद्र होते.ही बाब आश्चर्य आहे .काही केंद्रावर अपुऱ्या जागेमुळे मोठी गैरसोय झाली; तसेच काही ठिकाणी केंद्राला गळती लागली होती. पावसामुळे रविवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा सकाळपर्यंत सुरळीत न झाल्याने गैरसोय झाली.तर एका हातात ईव्हीएम मशीन आणि दुसऱ्या हातात लोटा घेऊन, आंघोळ न करताच मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या अधिकारी वर्ग या अनेक ञासाला सामोरे गेले .
@अनेक मतदान केंद्रावर टॉयलेट, बाथरूमची सोय नव्हती.ज्या शाळेत टॉयलेट बांधण्यात आले आहेत त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, पाहिल्यानंतर खऱ्या भारताचे दर्शन घडते! या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या किती लोकांवर आजपर्यंत कारवाई झाली? आणि आज होणार का ?
@. अनेक मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो खड्डे होते. अशा दर्जाहीन रस्त्यांना कोण जबाबदार आहे? आजपर्यंत यास जबाबदार असणाऱ्या किती लोकांवर कारवाई करण्यात आली? यांच्यावर कारवाई होणार का ?
@ मतदान केंद्रावर अनेकवेळा रात्री व दिवसा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. यासंदर्भात वीजपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार?
@ मतदान केंद्राच्या अवतीभवती घाणीचे प्रचंड साम्राज्य! डासांचा सर्वत्र वावर! कोणावर कारवाई करणार?
@ एकीकडे ईव्हीएम यंत्राच्या आधारे मतदान प्रक्रिया पार पाडणारी मतदान केंद्रावरील टीम सकाळी नैसर्गिक विधीसाठी मात्र उघड्यावर जात होती! किती लाजिरवाणी बाब! कोणावर कारवाई करणार? सुविधा नसल्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर की उघड्यावर बसायला भाग पाडणाऱ्या यंत्रणेवर?
अश्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक घटक काम करीत होते. तीन वेळा प्रशिक्षण देऊन ही प्रक्रिया राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पाठविण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीकडून प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना वेळोवेळी कारवाईची धमकी देण्यात येत होती. हे केला नाहीत तर कारवाई करू... आणि ते केला नाहीत तर कारवाई
मतदान प्रक्रियात बंद पडलेल्या शाळामध्ये सुविधा नसताना अशा डिजीटल इंडियातील भ्रष्ट भारतावर पोसलेल्या या जागेचा ok रिपोर्ट देणारे कोण ? त्यांच्यावर कारवाई होणार का ? हाच प्रश्न अश्या समस्यांना सामोरे गेलेला प्रत्येक अधिकारी विचारात आहे .
तसेच काही शिक्षकांना केला ..जाहीर निषेध
@माजलगाव मतदारसंघातील 350 राखीव कर्मचाऱ्यांना दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिवसभर काहीही कामही दिले गेले नाही .. तसेच त्यांचे प्रवास भत्ते मिळालेले नाहीत ..
@विनंती करुनही अपमानास्पद वागणूक दिली गेली..
@राखीव कर्मचाऱ्यांनी रिलीवींग लेटरची मागणी केली. त्यावर स्पष्टपणे नकार देण्यात आला.
@कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान करण्यासाठी कच्च्या कागदांवर अकाऊंट नंबर लिहून घेण्यात आले आणि प्रशिक्षण हॉलच्या बाहेर काढण्यात आले .
धारूर, वडवणी व माजलगाव तहसिलदारांचा निषेध



Social Plugin