परळी // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर परळीत विविध मार्गाने येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. सभेसाठी येणारी गर्दी लक्षात घेता परळी शहराकडे येणारी वाहतूक सकाळी 5 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात आली आहे.
परभणी, गंगाखेड, नांदेडकडे जाणारी वाहतुक तेलगावहुन माजलगाव पाथरीकडे तर
अंबाजोगाईहून गंगाखेड, नांदेडकडे जाणारी वाहतूक पिंपळा धायगुडा येथुन पुस मार्गे परळी जवळील धर्मापुरी फाटा येथून गंगाखेडकडे वळवण्यात आली आहे. सभेसाठी येणार्या वाहनांसाठी परळी बाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी जाण्यासाठी बसेसची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. सिरसाळा, बीड, माजलगावकडून येणाऱ्या वाहनासाठी नागनाथअप्पा हालगे इंजिनिअरिंग कॉलेज येथे पार्किंग करुन सभास्थळी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अंबाजोगाईकडून येणाऱ्या वाहनासाठी हॉटेल सपना जवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Social Plugin