अंबाजोगाई // रस्त्यावरून जाण्यासाठी जागा न दिल्याने झालेल्या किरकोळ वादातून १२ जणांनी एका तरुणावर तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना अंबाजोगाई शहरात गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यानंतर जखमी तरुणाच्या भावांनाही त्या आरोपींनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील गांधी नगर भागात राहणारा विनोद गणेश डाके हा तरुण गुरुवारी रात्री १२.३० वाजता मंगळवार पेठेत राहणारा मित्र राहुल शेळके याच्याकडून पैसे आणण्यासाठी गेला होता. तिथे विनोद आणि राहुल रस्त्यावर बोलत थांबले होते. यावेळी अक्षय काळे आणि गणेश कदम (दोघेही रा. भट गल्ली, अंबाजोगाई) हे दोघे तरुण तिथे आले आणि विनोदला रस्त्यावरून बाजूला हो म्हणाले. त्यावर विनोदने त्यांना बाजूने जाण्यास सांगितले. या कारणावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. विनोदच्या मित्रांनी मध्यस्थी करत वाद थांबविला आणि अक्षय आणि गणेश तिथून निघून गेले. मात्र पंधरा मिनिटांनी ते पुन्हा परतले. यावेळी त्यांच्यासोबत अनंत कदम, अनिल कदम, शिवा शिंदे, व्यंकट कदम आणि अन्य सहाजण तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडे घेऊन आले. ‘हा माजला आहे, याला खल्लास करा’ असे म्हणत त्यांनी विनोदवर हल्ला चढविला. या हल्ल्यात डोक्याला तलवार लागल्यामुळे आणि अंगावर लोखंडी रॉड आणि दंडुक्यांनी मारहाण केल्यामुळे विनोद गंभीर जखमी झाला. त्यानंतर सर्व आरोपी तिथून निघून गेले. दरम्यान, विनोदला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा भाऊ अनिल डाके, सुनील डाके, प्रेमकुमार डाके, राहुल हरिभाऊ शेलार हे आरोपींना जाब विचारण्यासाठी भट गल्लीत गेले. तिथे सर्व आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत जखमी झालेला विनोद आणि त्याच्या भावांवर सध्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विनोद डाके याच्या तक्रारीवरून सर्व आरोपींवर कलम ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे करत आहेत.

Social Plugin