पंढरपूर // रेल्वेच्या धडकेत पंढरपुरात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी (ता. 9) रात्री उशिरा येथील नवीन बसस्थनाकाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. आज सकाळी रेल्ले ट्रॅकवरुन जाणार्या काही लोकांनी ही घटना पाहिल्यानंतर अपघात झाल्याचे समोर आले.
सोमवारी (ता. 9) परिवर्तन एकादशी होती. एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल दर्शऩासाठी आले होते. एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी आलेले बाहेरगावचे हे भाविक असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एका व्यक्तीच्या हाताच्या मनगटावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंदण्यात आले आहे. यावरुन ते भाविक असावेत असा अंदाज आहे. यामधील एका व्यक्तीच्या अंगात जांबळ्या रंगाचा तर दुसर्याच्या अंगात लाल रंगाचा शर्ट आहे. रेल्वेच्या जोराच्या धडकेमुळे दोघांचेही मृत्युदेह छिन्नविच्छिन अवस्थेत पडले होते. या प्रकरणी अधिक तपास रेल्वे पोलिस करत आहेत.
Social Plugin