Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

व्हिडिओग्राफर ! या ग्रुपमधील मिञ संकटात म्हटल्यावर ग्रुपमध्ये सर्वच मिञ बेचैन झाले आणि अवघ्या १२ तासांत ६० हजार रुपये जमा करून केली मदत..

परळीचे छायाचित्रकार राम भाले आणि अंबाजोगाईचे नितीन चौधरी यांचे विशेषकौतुक ! 

नांदेड // व्हॉट्सअॅप हे कधी  केवळ विनोद आणि टाईमपासच नव्हे तर व्हॉट्सअॅपवरुन अनेक समाजोपयोगी कामेही करता येतात.. हे नांदेड येथील अशाच एका व्हॉट्सअॅप ग्रुपने  करून दाखविले आहे .एक कौतुकास्पद काम केले आहे. एका छायाचित्रकार मित्राचा अपघात झाल्याने त्याच्या परिवाराला धीर देऊन आर्थिक मदत देण्यात आली असून सध्या या व्हॉट्सअॅप ग्रुपच खूप कौतुक होत आहे.

नांदेड येथील छायाचित्रकार बाबाराव
खंडागळे यांचा दि. २१ रोजी अपघात
होऊन ते गंभीर जखमी झाले होते. नांदेड
येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर
उपचार सुरू आहेत. आर्थिक परिस्थिती
अत्यंत बिकट आणि डोक्यावर पितृछाया
नसलेल्या बाबारावचा  ज्या वेळी अपघात
झाला त्या वेळी रवी बेंदीकर, विलास दाढे,
दयानंद तिडके आणि जोंधळे या मित्रांनी
त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती
केले. 
 सदरील व्हिडिओग्राफर हा  या ग्रुपमध्ये असल्याने आणि तो मिञ संकटात म्हटल्यावर ग्रुपमध्ये चर्चा होऊन यातूनच मदतीचा ओघ सुरू झाला. आणि अवघ्या १२ तासांत ६० हजार रुपये जमा करून ही मदत त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आली. आणि त्या माऊलीला धीर देखील देण्यात आला.
विशेष म्हणजे चंद्रपूर येथे घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत परळीचे छायाचित्रकार राम भाले आणि अंबाजोगाई येथील नितीन चौधरी यांनी what'sup मिळवलेल्या बक्षिसाची
रक्कम देखील बाबाराव यांच्या उपचारासाठी देण्यात आली. एका छायाचित्रकार मित्रावर
आलेले संकट आणि त्यानंतर उदभवलेल्या
परिस्थितीवर नांदेड व परळीच्या छायाचित्रकार
बंधूंनी दाखवलेली मानवी कृती ही
बहुमूल्य आणि दिशादर्शक प्रेरणादायक आहे . सतत धावपळीतअसणाऱ्या एखाद्या छायाचित्रकाराला अशा संकटसमयी केलेली आर्थिक मदत खरेच खूप लाखमोलाची ठरली
असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून
उमटत आहेत.