मुंबई //सोशल मीडियामुळं कित्येक जणं एक रात्रीत स्टार झाले आहेत. प्रिया प्रकाश, डान्सिंग अंकल यांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे राणू मंडलची. काही दिवसांपूर्वी बंगालमधील स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'प्यार का नगमा है' गाणं गाणाऱ्या राणूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी राणूची तुलना थेट लता दीदींसोबत केली. व्हिडिओमुळं एका रात्रीत स्टार झालेल्या राणूला आता ओळखणंही कठीण झालं आहे. तिच्यात कमालीचा बदल झाला आहे.
एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, राणू मंडलला आता अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी विचारण्यात आलं आहे. एका कार्यक्रमाच्या टीमनं तर तिचा मेकओव्हरच केला आहे. या मेकओव्हरमुळं तिचा लूक पुर्णपणे बदलण्यात आला आहे. ती लवकरच कार्यक्रमासाठी मुंबईत येणार असल्याचंही बोललं
Social Plugin