Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

फाऊंडेशन स्कूलच्या क्रिकेट संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

परळी // अंबाजोगाई येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये फाऊंडेशन स्कूलच्या क्रिकेट संघाची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली यामध्ये रेहान शैख ने 6 बॉल मध्ये 22 धावा करून संघाला विजयी केले.

 उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेहान अजमुद्दिन शेख व आयान अजमुद्दिन शेख या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना खास क्रिकेट ट्रेनिंग साठी पुणे येथे फाउंडेशन स्कूल तर्फे पाठवण्यात आले होते.  

फाऊंडेशन शाळेतील विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली तालुका क्रीडा संकुल अंबाजोगाई येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी फाऊंडेशन स्कूलच्या 14 वर्षीय क्रिकेट संघाचा पहिला सामना बीड सोबत होऊन विजयाचा पताका घेऊन दुसरा व तिसरा सामना गेवराई तसेच पाटोदा क्रिकेट टीम सोबत विजयी घोड दौड करत विजयी पताका यशस्वीरित्या खांद्यावर घेऊन फायनल मॅच अंबाजोगाई संघासोबत यशस्वीपणे खेळ पूर्ण करत संघाला जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयी करून  शाळेची पताका अंबाजोगाई क्रीडा संकुल च्या मैदानावर फडकावून फाउंडेशन स्कूल चे नाव विभागीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेमध्ये नोंदवून यशस्वी वाटचाल करण्यासाठी मार्गस्थ झाले या क्रिकेट टीम मधील सर्व विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करीत विजय संपादन केला. 

यावेळी तेथील पंचांनी फाउंडेशन स्कूल च्या क्रिकेट संघाच्या विजय घोषणा करण्यात आली आयान शेख,रेहान शेख यांनी ओपनिंग बॅटिंग चे जबरदस्त प्रदर्शन करत संघाला जिल्ह्यात प्रथम क्रमांकासह विजयी मिळवून दिला.
याबद्दल शाळेचे अध्यक्ष विजयप्रकाश तोतला, उपाध्यक्ष रवी तोतला, शाळेच्या  व्यवस्थापिका सौ.रितू तोतला तसेच शाळेचे प्राचार्य ए.एस.रॉय व क्रिकेट संघास मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या ओम मेनकुदळे  यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये विजय संपादन केल्याबद्दल शाळेतील क्रीडा शिक्षक प्रा.डॉ जगदीश कावरे , श्रीधर जाधव , दिनेश गडदे , बिडगर सर,व सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.