Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Whatsup आता ‘Facebook’ सारखा, वापरा एकच ‘अकाऊंट’ अनेक ‘डिवाइस’वर, कसे तर वाचा ...



मुंबई //  व्हाॅट्स अ‍ॅप आता लवकरच आपल्या प्लॅटफॉर्म नवे फिचर लॉन्च करण्याचा तयारीत आहे. ज्या माध्यामातून आता व्हाॅट्स अ‍ॅपला अनेक डिवायसवरुन वापरता येणार आहे. हे नवे व्हर्जन व्हाॅट्स अ‍ॅपला मल्टी प्लॅटफॉर्म अ‍ॅप बनवेल. या फिचर मुळे यूजर्स मॅसेज पाठवण्यासाठी व्हाॅट्स अ‍ॅप प्रोफाइलला मोबाइल फोन, आयपॅड आणि डेस्कटॉपवर  वापरता येईल. आता पर्यंत एक व्हाॅट्स अ‍ॅप एकाच मोबाईल नंबरने लिंक असतो, ज्यामुळे सध्या व्हाॅट्सअ‍ॅप एकाच डिवायसवर वापरण्यात येत होते.

फेसबुक सारखे वापरता येणार व्हाॅट्सअ‍ॅप

व्हाॅट्स अ‍ॅपच्या या नव्या फिचरची माहिती व्हाॅट्सअ‍ॅपचे फिचर लिंक करणाऱ्या साइट WABetainfo ने दिली आहे. हा फिचर फेसबुक सारखे असणार आहे. फेसबुक लॉगिंन करण्यासाठी आयडी पासवर्डची गरज असते, तसेच व्हाॅट्सअ‍ॅपला देखील लॉगिंन आणि पासवर्डची आवश्यकता असेल. यामुळे यूजर्सचे सर्व मेसेज सर्व डिसाइसवर पाहता येतील. डेस्कटॉप वर्जनवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापरत करण्यासाठी फोनचे इंटरनेट कनेक्ट होणे आवश्यक आहे, परंतू व्हॉट्स अ‍ॅपच्या या फिचरमुळे ही समस्या येणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप देणार पेमेंट सर्विस

व्हॉट्सअ‍ॅप या वर्षांच्या अंति भारतात पेमेंट सेवा सुरु करण्यात येणार आहे. सध्या देशात व्हॉट्सअ‍ॅपचे जवळपास ४० कोटी युजर्स आहेत. कंपनी मागील वर्षापासून १० लाख यूजर्सला पेमेंट सेवा देते आहे आणि यावर परिक्षण करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या पेमेंट सेवेमुळे देशात सेवा देणाऱ्या Paytm, PhonePe, google pay यांच्या समोर मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.