Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

‘ अनेकांनाची बत्तीगुल’... बीडमध्ये कॉफी पिण्याच्या नावाखाली आंबटचाळे ; युगुलांसाठी ‘स्पेशल’ व्यवस्था -अपर पोलीस अधीक्षकांच्या स्टिंगअॉपरेशन सक्सेसफुल..!


बीड // पालकांचे मुलांकडे दुर्लक्षामुळे पाल्य हे मनमानी करीत आहेत .
शाळा, महाविद्यालयासह शिकवणीच्या नावाखाली आपले पाल्य तासन्तास घराबाहेर असते. खरोखरच ते शिक्षणासाठी जातात काय ? याची पालकांनी तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वच मुले वाईट नाहीत. मात्र, मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. गैरकृत्य टाळण्यासाठी मुलांशी वारंवार संवाद साधून त्यांचे ‘लोकेशन’ वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना पॉकेटमनी किती द्यायचा ? पॉकेटमनी कशासाठी वापरतात याचाही विचार करण्याची गरज आज काळाची गरज  झाली आहे.

      याचेच सैराट काल बीडमध्ये कॉफी पिण्याच्या नावाखाली कॉफी शॉपमध्ये बसून आंबटचाळे अर्धनग्न अवस्थेतील एका युगुलाला रंगेहाथ पकडले.या खुलेआम आंबटचाळे करणाऱ्या युगुलाचा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी चांगला धका शिकविला
 तसेच कॉफीशॉपवाल्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आणली.  बुधवारी रात्री ७ ते ९ दरम्यान असे दोन तास कबाडे यांनी बीड शहरात फिरून 'स्टिंगअॉपरेशन' केले.

या स्टिंगअॉपरेशनमध्ये
शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी तरुण धुम्रपान, मद्यपानासारखी व्यसने करतात. याचा त्रास ये-जा करणाऱ्यांसह परिसरातील व्यापारपेठेला होतो. तसेच शाळा, महाविद्यालय, शिकवण्यांच्याजवळ कॉफी शॉप उघडले आहेत. कॉफी पिण्याच्या नावाखाली युगुलांसाठी हा जणू ‘अड्डा’च ठरत आहे. हाच धागा पकडून बुधवारी रात्री ७ वाजता विजय कबाडे यांनी स्वत: दुचाकीवरुन शहरात फेरफटका मारला. आधी सिध्दीविनायक कॉम्प्लेक्समध्ये कॉफीबरोबर सिगारेटचा झुरका ओढणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अडगळीच्या ठिकाणी असलेल्या कॉफीशॉपकडे वळवला.

शाहूनगर भागातील दहावी, बारावीच्या शिकवणीसह एक महाविद्यालय असलेल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यातील एका कॉफीशॉपवर अचानक धाड टाकली. यावेळी एक युगुल पडद्याआड अर्धनग्न अवस्थेत दिसून आले. या दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्याकडे देण्यात आले. ही कारवाई विजय कबाडे यांच्यासह विशेष पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, रेवणनाथ दुधाणे, जयदीप सोनवणे, काकडे, गणेश नवले, हनुमान राठोड, अंकुश वरपे, सूरज काकडे आदींनी केली.


शॉपमध्ये बसण्याचे वेळेनुसार दर : युगुलांसाठी ‘स्पेशल’ व्यवस्था
शॉपमध्ये बसायचे असेल तर त्यासाठी वेळेनुसार वेगवेगळे दर ठरविण्यात आले आहेत. युगुलासाठी २०० ते ३०० रुपये वसूल केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.पोलिसांनीधाडटाकलेल्या कॉफीशॉपमध्ये युगुलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. दोन खुर्च्यासह बाजूने पडदे होते. तसेच ही व्यवस्था किचन रुमच्या बाजूस असल्याने इकडे कोणीही फिरकत नव्हते. इथे बसण्यासाठी अगोदरच ‘बुकींग’ करावी लागते.

@सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
कॉफीशॉपमध्ये दिवसभर अनेक युगुल बसून आंबटचाळे करीत असल्याचे चौकशीतून समोर आले. हाच धागा पकडून याच कॉफीशॉपमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. शॉपचालक राज संजीवन शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

@फुटेजवरुन ‘ब्लॅकमेलिंग’ ?
कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे करताना दुकानमालक सीसीटीव्ही फुटेजवरुन युगुलांना ब्लॅकमेल करण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कसलीही काळजी न घेता युगुल असे कृत्य करीत असल्याने धोक्याची घंटा नाकारता येत नाही

@@@@...कॉफीशॉपसह सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, मद्यपान करण्यासह काही युगुल अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे स्वत: फिरुन कारवाया केल्या. यापुढे असे प्रकार होणार नाहीत त्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना केल्या जातील. तसेच पालकांनीही मुलांकडे लक्ष द्यावे.
- विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक
@@@@@@@