Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मराठवाड्याचा वाळवंट होण्यास जर थांबायचे असेल ! परिस्थितीला बदलायचे असेल तर चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतील वृक्षसंवर्धन चळवळत सहभागी झालेच पाहिजे .


झाडे जगविण्याचा घेतला वसा, ५००० वृक्षांचे होणार संवर्धन


परळी // पर्यावरणाची होत असलेली अपरिमीत हानी, झाडांचे कमी होत असलेले प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणारी उष्णाता हे चित्र अत्यंत भयंकर स्वरूपाचे आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकची उष्णता जाणवत असून, कमी झालेल्या वनराईमुळे पावसाचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. एका वृक्षतज्ञाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे येत्या काही वर्षांत मराठवाड्याचा वाळवंट होतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीला बदलायचे असेल, सर्वत्र हिरवळ निर्माण करावयाची असेल तर प्रत्येकच नागरीकाने वृक्षसंवर्धनाच्या चळवळीसाठी योगदान दिले पाहीजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले.

परळी वैजनाथ शहरात चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून वृक्षसंवर्धन चळवळ हाती घेण्यात आली असून, त्याचा शुभारंभ आज सतिश बंग यांच्या गुरू स्कुटर येथून करण्यात आला. शहरातील जवळपास ५ हजार झाडांच्या संवर्धनाचाही ही मोहीम असून, त्यासाठी रोजंदारीवर मजुरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. झाडांच्या बुडाशी असलेली साफसफाई करणे, त्याच्या संरक्षणासाठी बसविण्यात आलेल्या जाळ्या निटनेटक्या करून मोकाट जनावरांपासून त्यांचे संरक्षण करणे, दारोदारी असलेली झाडांचे संवर्धन कसे करावे याबाबत नागरीकांत जागृती निर्माण करणे, त्यांना झाडांचे महत्व समजावून सांगणे असे या चळवळीचे स्वरूप आहे.
वृक्षसंवर्धनाच्या याळ चळवळीला अधिक गतीमान करण्यासाठी प्रत्येकाने यात सहभागी होणे गरजेचे आहे. भविष्यात या चळवळीच्या माध्यमातून वृक्ष बिसी चालू करण्याचाही मानस असून, त्याद्वारे वाढदिवसाच्या दिवशी झाडे भेट देणे, निधी एकत्र करून तो वृक्षांच्या लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी वापरणे, सजग नागरीकांचे मोठे जाळे निर्माण करून वृक्ष लागवडीची मोहीम सर्वत्र गतीमान करणे, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांना सहभागी करून घेणे असे याचे भविष्यातील स्वरूप असल्याचेही चंदुलाल बियाणी यांनी सांगितले. समाजातील दानशूर व्यक्तींना झाडांबाबत आस्था असेल आणि त्यातून काहीतरी करावे असा त्यांचा विचार असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांना वृक्षसंवर्धनासाठी मनुष्यबळ देवून मदत करू असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आज झालेल्या शुभारंभ प्रसंगी गुरू स्कुटरचे संचालक सतिश बंग, दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, आनंद हाडबे, अनिल जठार, ओम काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

@सतिश बंग यांचा पुढाकार@

गुरू स्कुटरचे संचालक सतिश बंग यांनी चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या वृक्षसंवर्धन चळवळीत काम करण्यासाठी पुढाकार घेतला. आजपासून त्यांनी या कामासाठी मनुष्यबळ देण्याचा संकल्प केला असून, शहरातील रस्त्यालगत, दारोदारी असलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी साफसफाई,जाळ्या निटनेटक्या करण्याच्या कामासाठी पुढाकार घेतला आहे.