पुणे // राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांचा मुलगा श्रीशैल गंगाधर म्हमाणे यांचे बुधवारी अकस्मात निधन झाले. श्रीशैलच्या लग्नानंतर अवघ्या विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सोलापूर जिल्हयातील कोरवली या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.निधनाचे वृत्त समजताच शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी कोरवली गावाकडे धाव घेतली आहे .
मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने श्रीशैल यास मंगळवारी सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीला सुज येऊन मुत्राशयात जंतूसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असताना बुधवारी ते मरण पावले. लग्नानंतर आकस्मिक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत श्रीशैल याचा विवाह २४ एप्रिल रोजी सोलापुरातील एका मंगल कार्यालयात झाले होते.
Social Plugin