सिकंदराबाद विभागातील कामामुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही अंशतः रद्द
परळी // परळी रेल्वे स्थानकाजवळ सिकंदराबाद विभाग, दक्षिण मध्य रेल्वे ने हाती घेतलेल्या नॉन-इंटर लॉक वर्किंग करिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्या मुळे नांदेड विभागातील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1) गाडी संख्या 57522
पूर्णा ते परळी सवारी गाडी –
दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी संख्या 57521
परळी ते पूर्णा सवारी गाडी –
दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1) गाडी संख्या 57554
आदिलाबाद ते परळी सवारी गाडी दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी संख्या 57553
परळी ते आदिलाबाद सवारी गाडी दिनांक 9 आणि 10 मे, 2019 रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी संख्या 57540
परळी ते अकोला सवारी गाडी
दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
4) गाडी संख्या 57539
अकोला ते परळी सवारी गाडी
दिनांक 8 आणि 9 मे, 2019 रोजी
परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
Social Plugin