परळी वै
परळी // महावितरणची बहुतांश विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. या फांद्या व वेली काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षति होत असते. ही हानी टाळण्याकरिता परळी मध्ये बुधवार दि.15 मे रोजी परळी शहरातील सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विद्युत बंद राहणार असल्याचे महावितरण कडुन सांगण्यात आले आहे .
वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे.
परळी परिक्षेत्रातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची त्या दृष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधितांची पूर्वपरवानगी घेऊन या फांद्या छाटून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वीजतारांमध्ये अडकलेले पतंग, फ्लॅक्स बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. वीजवाहिन्यांत अडकलेले पतंग, कपड्यांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
याशिवाय सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.
पावसाळ्यात वादळ वा-यात सतत विद्युत लाईट जाण्याच्या तक्रारी होऊ नयेत यासाठी आणी विद्युतसेवा सुरळीत व्हावी म्हणुन काही उपाय योजना करण्यासाठी आहे.
विद्युत ताराला अडथळा असलेली झाडे तोडणे,132 केव्ही सबस्टेशनची दुरुस्ती करणे अन्य कामासाठी परळी शहर सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विद्युत बंद राहणार असल्याचे महावितरण कडुन सांगण्यात आले आहे. शहरातील सर्व विद्युत ग्राहकांना कळविण्यात येते की,उद्या दि.15मे रोजी पावसाळा पूर्व देखभाल व दुरूस्ती कामासाठी 33केव्ही परळी उच्चदाब वहिनी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत बंद करण्यात येणार असून सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे.
संतराम गित्ते,
अति.कार्यकारी अभियंता(प्रभारी),परळी

Social Plugin