Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी बसआगार म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा" या कारभाराचा फटका मात्र ! प्रवाशांना .


मशीन आणि पेपररोल नसल्यामुळे अनेक बस जागेवर थांबून; प्रवाशांची हेळसांड


 परळी // परळीसह बीड जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकातील बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे अगोदरच उन्हाने होरपळत असलेल्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याने प्रवाश्यात संताप व्यक्त  केला जात आहे .

 याचे उदाहरण म्हणजे परळी बसआगाराचा कारभार  "आंधळा दळतो आणि ......पीठ खातो" अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
परळी बस डेपो म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा" अशी अवस्था झाली आहे, राज्य परिवहन महामंडळा कडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याच सुविधा बस्थानाकात उपलब्ध नाहीत. परळी  आगारातील बसेसची अवस्था पाहता  प्रवाशांना काळजी वाटतेआहे.
आगाराकडे असलेल्या बसेसपैकी  अधिक बस खिळखिळ्या झालेल्या आहेत. त्यातच वारंवार ब्रेक डाउन होणे, टायर फुटणे, तुटलेले छप्पर अशी एसटीची अवस्था झाली असून, या दुरवस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच त्या बसेस पुन्हा दुरुस्ती रंगरंगोटी करून चालवण्यात येत आहेत. अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत. , रस्ते वाहतुकीतील सुरक्षित प्रवास या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची  जाणीव रहावी, अशी भावना ही प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

विशेष म्हणजे प्रवाशांना तिकीट देण्याच्या अनेक मशीन खराब झाल्या आहेत त्या मशिन दुरुस्त केल्या जात नाहीत तर पेपर रोल सुद्धा वेळेवर दिला जात नसल्याने वाहकाना मोठया अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशीआधिक माहिती अनेक एसटीच्या कर्मचाऱ्यान कडून समजली आहे, त्यामुळे कर्मचारी बस स्थानकात वेळेवर उपस्थित असले तरी डेपोच्या ढासळत्या कारभाराचा मानसिक आणि आर्थिक फटका मात्र प्रवाशांना बसत आहे

 घाणेरडे संडास- बाथरूम, पाण्याचा ठणठणाट , सगळीकडे घाणीचे साम्राज्य, थुंकलेले रंगीबेरंगी कोपरे, प्रवाशी बसण्याच्या ठिकाणी धूळ तसेच  बसचे वेळापत्रक सांगण्यासाठी कंट्रोलरुम मध्ये कर्मचारी वेळेवर नसतात   ,
 बस स्थानकात खड्डे, दगडगोटे  उघडे झाल्याने प्रवाश्यांना नीट चालता येत नाही,सर्वात मोठी परळीकरांच्या अभिमानाची बाब म्हणजे  येथे  मात्तबर नेते असताना परळी बस्थानकाची अशी अवस्था व्हावी हे येथील जनतेचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल,