Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पत्र्याच्या आडुला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई //  मोरेवाडी भागातील पाण्याची टाकी परीसरातील राहत्या घरी रात्री जेवण करुन घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर 
 पत्र्याच्या आडुला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या
केल्याची घटना घडलीआहे. अमोल श्रीराम क्षिरसागर (३५ ) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नगर पालिकेतील इलेक्ट्रीक कंत्राटदार श्रीराम क्षिरसागर यांचा मुलगा अमोल हा मोंढ्यात मोटारी दुरुस्तीचे काम करत होता. रात्री जेवण करुन घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर अमोलने गच्छीवरील पत्र्याच्या रुममध्ये आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर याची माहीती पोलिसांना देण्यात आली. त्याच्या   पार्थीवाची स्वाराती रुगणालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.