परळी // सध्या तीव्र उन्हाळ्यात काहीही घटना कानावर पडत असल्याने आणि सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे ही नागरिकांच्या भितीमध्ये भर पडत आहे.
मथुरानगर ,जलालपूर व जिरेवाडी या परिसरापासून काही अंतरावर सध्या परळी -बीड -नगर रेल्वे मार्गाची कामे सुरू आहेत. या कामात दगड फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यात येतात यामुळे काही क्षण हादरा जाणवला असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जवळच सध्या रेल्वे मार्गावरील पुल बनविण्यासाठी खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी कठीण पाषाण फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यात येतात. यातूनच या परिसराला काही क्षण हादरा जाणवला असण्याची शक्यता आहे.
सध्या परळी -बीड -नगर रेल्वे मार्गाची कामे सुरू आहेत. या कामात दगड फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यात येतात यामुळे काही क्षण हादरा जाणवला असण्याची शक्यता आहे. जलालपूर व जिरेवाडी परिसराला दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारास अचानक काही क्षण जमिनीतून गूढ आवाज व पत्रे हादरल्याचा अनुभव आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती
शहरालगत असलेल्या मथुरानगर, जलालपूर व जिरेवाडी परिसराला दुपारी २.१० वाजता जमीन हादरली व जमिनीतून आवाज आला असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. अचानक जाणवलेल्या या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रखरखत्या उन्हात नागरिक घराबाहेर पडले होते. मोठा आवाज झाला असल्याचे काही जण सांगत होते. मोठा आवाज परिसरातील लोकांना ऐकायला आला त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र झाले होते. नेमका हादरा कशामुळे बसला हे स्पष्ट झाले नसले तरी या परिसरापासून काही अंतरावर सध्या परळी -बीड -नगर रेल्वे मार्गाची कामे सुरू आहेत. या कामात दगड फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यात येतात यामुळे काही क्षण हादरा जाणवला असण्याची शक्यता आहे. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Social Plugin