Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लग्‍न कार्यासाठी निघालेल्या कु्रझरला ट्रकचा अपघात , अपघातात 5 जणांचा मृत्यू .



नांदेड // कु्रझर आणि ट्रकमध्ये समोरा-समोर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यु झाला असून त्यामध्ये क्रुझरच्या चालकाचा देखील समावेश आहे. मुलाच्या लग्‍नासाठी क्रुझर गाडीतुन हैदराबाद येथे निघालेल्यांचा शंकरपेठ येथे शनिवारी भीषण अपघात झाला.  मृतांमध्ये देगलूर येथील लाईन गल्‍लीत राहणार्‍या सरसंबे कुटुंबातील तिघांचा, चालकाचा आणि अन्य एकाचा समावेश आहे.

गुंडप्पा शिवलिंग सरसंबे (48), रजनी गुंडप्पा सरसंबे (42) आणि शिवानी बंडप्पा सरसंबे अशी मयतांची नावे आहेत. चालक आणि इतर एकाचे नाव समजु शकले नाही. सरसंबे कुटुंबातील मुलाचे दि. 28 रोजी हैदराबाद येथे लग्‍न आहे. लग्‍न कार्यालयासाठी सरसंबे कुटुंब आणि इतर नातेवाईक देगलूर येथून क्रुझरने हैदराबाद कडे जाण्यासाठी निघाले होते.

देगलूरपासुन दोन तासाच्या अंतरावर असलेल्या शंकरपेठ येथे समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने क्रुझरला धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपुर्ण सरसंबे परिवारावर शोककळा पसरली आहे.