Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

# खूशखबर ! आता ग्राहकाला एकाच घरात DTH डीशवर दोन टीव्ही कनेक्शन लावता येणार ...


मुंबई //  ‘डायरेक्ट टू होम सर्विस’ म्हणजेच DTH ने आपल्या ग्राहकांकरिता एक नवी योजना आणली आहे या योजनेमुळे ग्राहकाला घरात एकाच DTH वर दोन टीव्ही कनेक्शन लावता येणार आहे. ग्राहकांसाठी हे मोठे गिफ्ट ठरणार आहे. आता मल्टिपल कनेक्शनवर एनसीएफ चार्ज लावायचा आहे की नाही हा निर्णय मात्र टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने सर्विस प्रोवाइडर्स वर सोडला आहे. तरी देखील साधारणपणे एका घरासाठी केवळ ५० रुपये प्रति कनेक्शन एनसीएफ चार्ज आकाराला जाणार आहे.

याच धोरणांतर्गत साधारणपणे प्रत्येक ग्राहकाला घरातील प्रत्येक कनेक्शन मागे केवळ ५० रुपये एनसीएफ चार्ज द्यावा लागणार आहे. DTH ची ही सेवा इतर DTH सर्विस प्रोव्हायडर पेक्षा स्वस्त आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या टाटास्काय आणि एअरटेल या दोन कंपन्यांच्या सेवांपेक्षा ही सुविधा स्वस्त आहे. यापैकी एका कंपनीकडून या सुविधेसाठी ८० रुपये घेतले जातात.

‘ट्राय’ च्या नव्या नियमानुसार सिंगल कनेक्शनसाठी ग्राहकांना १३० रुपये एनसीएफ चार्ज द्यावे लागतात. ज्यामध्ये १०० एसडी चॅनल आणि 50 एचडी चॅनल पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त दुसऱ्या चॅनल्स करिता ग्राहकांना अधिक किंमत द्यावी लागते. पण नव्या सेवेअंतर्गत ग्राहकाला दोन्ही टीव्ही कनेक्शन घेतल्यानंतर मिरर चॅनल ची सुविधा मिळते. ग्राहकांना दोन्ही टीव्ही वर वेगवेगळे चॅनल पर्याय देखील उपलब्ध होतो.