Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

थेट फिल्ड वर जाऊन रिपोर्ट चेक करणारे अधिकारी डॉ. अस्तिककुमार पांडे बीडचे नवे जिल्हाधिकारी


बीड जिल्हा मोठ्या अपेक्षेने पाहत आहे
बीड //भ्रष्टाचाराने बदनाम झालेल्या  विभागाची पुन्हा एकदा विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी पांडे यांना ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. खमक्या आणि पारदर्शक कारभार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी बीड जिल्हा मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. अस्तिककुमार पांडे म्हणजे दुसरे केंद्रेकर असे बोलले जात असल्याने जिल्ह्याच्या नजरा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागल्या आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अस्तिककुमार पांडे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार हे निश्चित झाल्यानंतर सोशल मीडियावर अकोलाचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांचे काम शोधल्या गेले. अनेक धडाकेबाज कामांचे व्हिडीओ व्हायरल झाले. पांडे हे शिस्तीचे आणि कामाची उरक असणारे अधिकारी असल्याचे समोर आले. केवळ कागदोपत्री नाही तर थेट फिल्ड वर जाऊन काम करणारे अधिकारी बीडला लाभल्याचे समोर आले. अशीच कामाची पद्धत असणारे आयुक्त सुनील केंद्रेकर यांना बीड जिल्ह्याने डोक्यावर घेतले होते. ते आता विभागीय आयुक्त आणि त्याच चौकटीत काम करणारे जिल्हाधिकारी पांडे यांच्या मुळे बीड जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

पांडे यांनी पदभार स्वीकारताच बेशिस्त अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या समोर अनेक आवाहने आहेत, बीडचे प्रशासन भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसले आहे. मोठे अधिकारी लाच लुचपत खात्याच्या गळाला लागत आहेत. पुरवठा विभाग बदनाम झाला आहे. भूसंपादन विभागात अनेक घोटाळे झाले आहेत. पाणी पुरवठ्याच्या योजना गायब आहेत. वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायतीमध्ये मनमानी सुरू आहे. कोट्यावधीचा आलेला निधी कोठे चालला यावर रामबाण उपाय त्यांना शोधावा लागणार आहे. प्रशासनातील घाण साफ करावी लागणार आहे. यासोबतच बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजनांसाठी ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही सोडवावे लागणार आहेत. या सर्व कसोटीवर डॉ अस्तिककुमार पांडे उतरणार आहेत हे निश्चित. कारण त्यांचे अकोला जिल्ह्यातील काम कायम लक्षात राहणारे आहे.