योगेश्वरी कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी जमीनवरुन केली, विश्वाची सफर ...
अंबाजोगाई // विज्ञान विषयातील खगोलशास्त्रीय घटकांचा सखोल अभ्यास करण्यासाठी, तसेच विद्यार्थीनींना आकाश निरिक्षणाची व खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी या उद्दिष्टाने गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या वतीने खगोलअभ्यासक हेमंत धानोरकर यांच्या खगोलशास्त्र मार्गदर्शन व प्रत्यक्ष आकाशनिरिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते
. दि.13 मार्च 2019 योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या गो.कुं.यो. कन्या विद्यालयाच्या गच्चीवर शाळेच्या विद्यार्थीनींसाठी आकाश निरक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सायं. 7 ते रात्री 10 आणि पहाटे 5 ते 7 या वेळेत शाळेतील इयत्ता 8 वी आणि 6 वी च्या विद्यार्थीनींनी खगोलअभ्यासक हेमंत धानोरकर यांच्या मदतीने आकाशातील ग्रह,तारे, चंद्र, राशी - नक्षत्रे यांचे दुर्बिणीतून निरिक्षण केले. राशी नक्षत्रे यांचे आकार, मनोरंजक कथा त्यातील विज्ञानही समजावून घेतले.
प्रत्यक्ष आकाश निरिक्षणाअगोदर विद्यार्थीनींना PPT व्दारे विश्वाची रचना व स्वरुप, दिर्घीका -प्रकार, ताऱ्यांचा जीवनक्रम या विविध संकल्पना समजावून सांगण्यात आल्या. त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकासमाधान करण्यात आले.
त्यानंतर रात्री 7 ते 10 या वेळेत शाळेच्या गच्चीवर प्रत्यक्ष आकाशनिरिक्षणासाठी विद्यार्थीनींना बोलावण्यात आले. यावेळी विद्यार्थीनींनी चंद्रावरील खड्डे (विवरे), व्याध तारा यांचा थेट दुर्बिणीतून अनुभव घेतला. तसेच ध्रुव तारा, सप्तर्षी, मृग नक्षत्र, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह अशा राशी व नक्षत्रे यांची मनोरंजक व खगोलशास्त्रीय माहिती देत हेमंत धानोरकर व गणेश कदम सरांनी उपस्थित सर्वांना विश्वाची सफर घडवली.
रात्री 10 नंतर पून्हा त्याच पहाटे 5 वाजता सहभागी विद्यार्थीनीसाठी आकाश निरिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी हेमंत धानोरकर सरांनी कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर या राशींची व ताऱ्यांची ओळख करून देत गुरु ग्रह आणि त्याचे उपग्रह, शनिग्रह आणि शनिची कडी, शुक्रग्रह यांचीही भेट दुर्बिणीव्दारे घडवून दिली.
यावेळी योगेश्वरी संस्थेचे सचिव श्री गणपत व्यास सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्याध्यापिका जालनेकर मॅडम, उपमुख्याध्यापिका परोपकारी मॅडम, विज्ञान शिक्षिका क्षीरसागर मॅडम, मुंडे मॅडम, सर्व सहकारी व कर्मचारी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.
Social Plugin