पगार होत नसल्यामुळे ,शिक्षकाची गळफास घेवूनआत्महत्या...
अर्धापूर //
शहरातील फुलेनगर भागात राहणा-या एका तरुण शिक्षकाने आपल्या राहत्या घरी मंगळवार(ता 26) दुपारी गळफासघेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पगार मिळण्याची शास्वती नसल्यामुळे आत्महत्या करित आहे आसे सुसाईड नोट मध्ये लिहले असून नोकरीसाठी संस्थाचालकाला दिलेले पैसे परत घ्या असे लिहले आहे.मयत चंद्रशेखर नागनाथ पांचाळ हा हादगाव तालुक्यातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मयत पांचाळ हा खासगी शाळेत गेल्या पाच वर्षापासून विना वेतनावर काम करित होता. त्यांच्या आत्महात्येमुळे खासगी शाळेतील शिक्षकांच्या पगाराची प्रश्न पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे.

Social Plugin