परळी //..
शहरातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दि. ७ रोजी राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक आ. विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका काढण्यात येते. यावर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दि. ७रोजी करण्यात आले. सुरुवातीला पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी व संचालक मंडळाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे व शिक्षक आ.विक्रम काळे यांचा सत्कार केला.
यावेळी पतसंस्थेचेउपाध्यक्ष अनिल आष्टेकर, सचिव जितेंद्र नव्हाडे , कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे, राजाभाऊ मराठे, रंगनाथ सावजी,रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ. सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्यासह व्यवस्थापक किरण सावजी ,अश्विन बुरकुले, महेश घेवारे, जालिंदर गिरी, दिपक कुसुमकर, राहुल रोडे, कृष्णा शिंदे आदी कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी उपस्थित होते.
Social Plugin