Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईच्या दर्पण पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ..गोकूळ पवार, अनंत कुलकर्णी व पुनमचंद परदेशी



  • अंबाजोगाई //अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने जिल्हातील पत्रकाराच्या गुणवत्ता वृद्धीसाठी महत्वपूर्ण ठरलेल्या अंबाजोगाई दर्पण पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पत्रकार बंधवानी उत्तम प्रतिसाद दिला. परिक्षकांनी २०१९ साठीच्या पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहिर केला असून गोकूळ पवार, अनंत कुलकर्णी व पुनमचंद परदेशी हे पत्रकार संघ अंबाजोगाईच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ६ जानेवारी दर्पणदिनी मान्यवराच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश लखेरा व सचिव विरेंद्र गुप्ता यांनी दिली.


            ६ जानेवारी २०१९ रविवार रोजी सांयकाळी ६ वाजता येथील नगर परिषद मिटीगहॉल अंबाजोगाई येथे दर्पण दिनानिमित पुरस्काराचे वितरण व पुरस्कार प्राप्त पत्रकाराचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री यशवंत भंडारे (संचालक महिती व जनसंपर्क विभाग औरंगाबाद) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राजकिशोर मोदी, जिल्हाअध्यक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री पांडूरंगजी गौरे (सहाय्यक व्यस्थापक एअर इंडिया मुंबई व सदगुरु श्री वामनराव पै यांचे शिष्य) आणि प्रमुख अतिथी म्हणून रमेशराव आडसकर (चेअरमन अंबासाखर) नंदकिशोरजी मुदंडा (ज्येष्ठ समाज सेवक) राजेसाहेब देशमुख (शिक्षण व आरोग्य सभापती जि. प. बीड) पृथ्वीराजजी साठे (माजी आमदार, केज विधानसभा) अदिच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या वर्षी पत्रकार संघाच्या दर्पण पत्रकरिता पुरस्कारासाठी परिक्षकांनी स्वांतत्र्यसैनिक कै. भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कारसाठी गोकूळ पवार (शिरुर कासार जि. बीड), कै. धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी अनंत कुलकर्णी (परळी वै.जि. बीड) आणि पत्रकारसंघ अंबाजोगाई पत्रकारिता पुरस्कारासाठी पुनमचंद परदेशी (अंबाजोगाई, जि. बीड) या पत्रकाराची निवड केली आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांना मान्यवराच्या हस्ते या वेळी पुरस्काराचे वितरण केले जाईल. तरी अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने अयोजित दर्पणदिन पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील पत्रकार व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे विश्वस्त अमर हबीब, प्रा. नानासाहेब गाठाळ, अशोक गुंजाळ, पत्रकारसंघाचे अध्यक्ष प्रकाश लखेरा व सचिव विरेंद्र गुप्ता यांच्या सह पत्रकार संघाचे सर्व पदधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.