परळी वैजनाथ // सनातन हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य पद असणार्या शंकराचार्य चार मुख्य पिठांपैकी श्रुंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू प.पु. श्री विधुशेखर भारती महास्वामी हे भारत विजय यात्रेनिमित्त रविवार दि.३ फेब्रुवारी रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत येणार आहेत.२,३,४ फेब्रुवारी रोजी भारत विजय यात्रा बीड जिल्ह्यात असणार आहे.
शंकराचार्य श्री विधुशेखर भारती महास्वामी शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी हिंदुस्थानात चार धर्मपीठांची स्थापना केली द्वारका,जगन्नाथपुरी,श्रुंगेरी आणि बद्रीकेदार हे चार मुख्य पीठे आहेत.यामध्ये दक्षिण भारतात शारदा श्रुंगेरी हे एक आहे.आद्य शंकराचार्यांचा या ठिकाणी सर्वाधिक वास होता म्हणून हे शारदापीठ म्हणून ओळखले जाते.श्रृंगेरी पीठाचे विद्यमान शंकराचार्य जगतगुरू स्वामी श्री विधुशेखर भारती महास्वामी हे पीठाचे ३७ वे आचार्य महास्वामी आहेत.स्वामींजीनी वेदांचे तसेच वेदातांचे अध्ययन गुरूस्वामी श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांचेकडे पूर्ण केले आहे
श्री विधुशेखर भारती महास्वामीजी हे भारत भ्रमण करत असून हिंदू संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते विविध शहरांना भेटी देत आहेत.३ फेब्रुवारी रविवार रोजी श्री विधुशेखर भारती महास्वामी हे प्रभु वैद्यनाथाला वेदोक्त शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करणार आहेत.त्यांच्या या धर्मप्रचार दौऱ्यासाठी शासकीय-प्रशासकीय यंत्रणाना सूचना करण्यात आल्या आहेत.या साठी जय्यत तयारी सुरू आहे.
Social Plugin