Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जि.प. शिक्षण क्षेत्रात शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थिनीला अश्‍लील एसएमएस पाठविल्याने एकच खळबळ !


शिक्षका विरोधात तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल
गेवराई // रोहीतळच्या जि.प. शाळेत एका शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थिनीला अश्‍लील एसएमएस पाठविल्याने एकच खळबळ .
   शिक्षकाविरोधात तलवाडा पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कलमा नुसार गुन्हा दाखल झालाआहे. गुन्हा दाखल होताच हा शिक्षक फरार झाला असल्याचे सांगण्यात येते. .
एक महिन्यापूर्वीही या शिक्षकाने एका मुलीला अश्‍लील भाषा वापरली होती, तेव्हा सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यात आले होते. या घटनेने जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी एस.टी. बनसोडे हा शिक्षक रोहीतळच्या जि.प. शाळेमध्ये रुज झाले. या शिक्षकाने सहावी वर्गात शिकणार्‍या  विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्‍लील एसएमएस पाठवला. हा मोबाईल विद्यार्थिनीच्या पित्याचा आहे .मात्र तो मुलीकडे असायचा. पिता आडाणी असल्यामुळे मुलगी मोबाईल बाळगत होती. याच संधीचा फायदा बनसोडे याने उचलला आणि त्याने सदरील विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्‍लील भाषेत एसएमएस पाठविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पित्याने तलवाडा पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी शिक्षक बनसोडे याच्याविरोधात कलम ३५४ (अ), ३५४ (ड), ५०९, ११, १२ बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न तलवाडा पोलिस करत होते. गुन्हा दाखल होताच शिक्षक फरार झाला. यापूर्वीही या शिक्षकाने एका मुलीला अश्‍लील भाषा वापरली होती त्यामुळे या शिक्षकाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्यावेळी हे प्रकरण मध्यस्थी करून मिटविण्यात आले होते. पुन्हा या शिक्षकाने सहावीच्या वर्गात शिकणार्‍या मुलीला अश्‍लील एसएमएस पाठवून गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम केल्याने जि.प. शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.