अंबाजोगाई //एन .सी. च्या माध्यमातून जीवनात शिस्त निर्माण होते , आपणही राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रशिक्षण घेतले आहे . त्या माध्यमातून सैन्यदलात जाण्यास प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन जेष्ठयेतमीक्षक मिलिंद भागवत यांनी केले .
येथील एन .सी.सी. विभागास आय.बी.एन. चे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांनी सदिच्छा भेट दिली . त्या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख , जिल्हा शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे , प्राचार्य डॉ. उदय जोशी , मेजर एस.पी. कुलकर्णी उपस्थित होते .
छात्र सैनिकांच्या पथसंचलनाचा सराव पाहून सर्वचजण भारावले .
यावेळी प्राचार्य डॉ . उदय जोशी यांनी भागवत यांचा सत्कार केला . शेवटी पर्यवेक्षक गणेश पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले .
Social Plugin